January 16, 2021

स्वामिनीमुळे मिळणार निराधारांना नेत्र ज्योत—–घाटंजी येथे स्वामिनी चे नेत्र तपासणी शिबीर संपन्न

यवतमाळ प्रतिनिधी:- जगातील सर्वश्रेष्ठ दान म्हणजे नेत्रदान ! असे स्लोगन सरकारने प्रत्येक गावात लिहिले मात्र गावातील वृद्धांना ती पाटी वाचता यायला हवी एवढी दृष्टी उरली नाही . डोळे असतांनाही वयामुळे आपल्याला अंध जगावं लागतं या पेक्षा मोठे दुखं नाही . हे सर्व असतांना लॉकडाऊन लागले आधीच परिस्थिती बिकट त्यात मोफत आरोग्य शिबिरे थांबली . तेव्हा या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करीत स्वामिनी दारूबंदी मोर्चा यवतमाळ व त्याचे संयोजक महेश पवार यांनी आरोग्य आधारित सर्वे घाटंजी येथे केला व ३० डिसे. रोजी डॉ . विलास मून , नेत्रचिकित्सा अधिकारी घाटंजी यांच्या मदतीने नेत्र तपासणीचे शिबीर आयोजित केले ज्यात सर्वेत आढळलेल्या डोळ्याच्या रुग्णांना बोलविण्यात आले . सदर कार्यक्रम घाटी (घाटंजी) येथे स्वामिनी जनपक्ष कार्यालयात पार पडला .
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मेळावे , सभा यांना बंदी घातली ती फक्त नावापुरती मात्र याची अंमलबजावणी हि जीवनावश्यक बाबींवर होतांना दिसत आहे . मोतीबिंदू , डोळ्याचे इतर आजार ग्रामीण भागात सामान्य आहेत तेव्हा वृद्धांची नेत्र ज्योत जाने हे कुणासाठी नव्हे . ज्यांनी यासाठी शासकीय उपाययोजना घेतल्या त्यातील अनेकांच्या शस्त्रक्रिया फोल ठरल्या . यामुळेच आता वृद्धांनी म्हातारपणा सोबत ह्या आजारांना देखील स्वीकारले . लॉकडाऊन मुळे अनेकांचा रोजगार गेला , त्यात वृद्धांसाठी हा विषाणू जीवघेणा तेव्हा वृद्ध आरोग्यसेवे पर्यंत पोहोचू शकत नव्हते . लॉकमध्ये अनेक नको त्या आजारांची लागण त्यांना झाली तरी मात्र काळजीपोटी निराधार , वृद्ध यास सहन करीत होते . सदर अडचणीला लक्षात घेत महेश पवार , स्वामिनी दारूबंदी मोर्चा यवतमाळ , यांच्या तर्फे घाटंजी येथे घरोघरी जाऊन आरोग्य सर्वे करण्यात आला त्यातून निष्पन्न झालेल्या माहितीनुसार त्यांनी शिबिरे घेण्याचे ठरविले व काल वृद्धांसाठी पहिले नेत्र शिबीर आयोजित केले . कसलीही गर्दी व हलगर्जीपणा होऊ नये म्हणून ३० वृद्धांच्या गटाची काल तपासणी करण्यात आली . २१ जानेवारी रोजी त्यांची शस्त्रक्रिया होणार असून जर त्यांची शस्त्रक्रिया यशस्वी राहिली तर लगेच दुसऱ्या टप्प्यात सर्व रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी सज्ज केले जाईल . तसेच सर्वेत आढळलेल्या बाबींवर एकेके करून काम केल्या जाईल असे महेश पवार त्या प्रसंगी म्हणाले .

स्वामिनी दारू बंदी मोर्चा हा राज्यातील दारू बंदी बाबतीत असणारे सर्वात मोठे महिला संघटन आहे . सध्या स्थानिक पातळीवर गरजूंची मदत ते महिलांच्या सबलीकरणात गृहउद्योग तर राष्ट्रीय पातळीवर चालू असलेल्या किसान आंदोलनात सक्रीय सहभागापर्यंत हि संघटना काम करीत आहे . महेश पवार हे याचे संचालक असून हे शिबीर देखील त्यांच्या नेतृत्वात पार पडले . प्रसंगी या शिबिरासाठी अमोल झाडे , धीरज भोयर , अमोल मोरे , साबीर शेख , सुरेश गेडाम , सुरेश ढोणे यांनी अथक परिश्रम घेतले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *