January 16, 2021

सुसंस्कार विद्यामंदिर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

यवतमाळ: सुसंस्कार विद्यामंदिर येथे स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या, अनंत अडचणींवर मात करत मुलींसाठी पहिली शाळा सुरू करणाऱ्या भारतातील पहिल्या शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची 190 वी जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शाळेचे सचिव श्री के संजय सर व प्रमुख पाहुण्या म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका सौ के उषा मॅडम यांची उपस्थिती लाभली .


कोरोना संक्रमणाला विचारात घेऊन ऑनलाइन आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून झाली. उच्च माध्यमिक कार्यक्रम कार्यक्रम साजरा माध्यमिक व प्राथमिक विभागात हा कार्यक्रम साजरा झाला. उच्च माध्यमिक विभागात समाज सेविका, कवी आणि वंचितांसाठी आवाज उठवणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका व मुख्याध्यापिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावर भाषण तसेच सावित्रीबाईंच्या वेशात सावित्रीबाई चे विचार व्यक्त केले. याप्रसंगी गणिका जांगिड ,सानवी कदम, वेदश्री देशमुख ,स्वानंदी गुल्हाने, रिद्धी गाढवे ,प्रतिक्षा बिसेन, श्रावणी पाचकोर ,गार्गी इंगळे, कृष्णा मोरे देव अग्रवाल ,आदित्य बोनमुलवार, शांभवी पांडे, सानिका उईके भक्ति भीरंगी व खुशबू जाजू या विद्यार्थ्यांचा सहभाग लाभला .
पूर्व प्राथमिक विभागातील आरोही टाटाजी, शिवन्या राठोड, सानवी ठाकरे ,हंसिका जांगिड ,स्वरा कोट्टावर, ओजस्वी दरेकर या चिमुकल्यांनी सावित्रीबाई फुले यांचा वेश परिधान करून आपले विचार व्यक्त केले. प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा, त्यांचे आत्मचरित्र, वेशभूषा व संवाद आणि कविता सादर केल्या शुभ्रा कुबडे, स्वराली देऊळकर, आरोही बोरुंदिया, वीरा कुर्लेपवार आभा पुंडशास्त्री, सावी दाभाडकर ,रुद्राणी वट्टी, स्वरा काळे, कृष्णा धकाते, रिया माकडे, काव्या भोयर, अन्वी माकडे , श्रुतिका वाकडे, शांभवी बोंगुलवार ,स्वरा ढोरे, विराज मेश्राम, कश्यप निचळ, सई राईकवार, समर्थ तेजाने, रोनक गाढवे, धनश्री निस्ताने, आदर्श राजाभोज, संस्कार काळे, वंशराज अजनकर, तिथी आसरे, सई महागावकर ,हर्षल जांगिड, अक्षरा जाधव, पार्थ जाधव, जिज्ञासा मधुरा जुनुनकर, परवली मारावार, विघ्नेश गुप्ता, संयम बोरुंदिया, यशस्वी पवार, या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला.


याप्रसंगी शिक्षकांनी सावित्रीचा वेश परिधान करून आपले विचार प्रगट केले व शिक्षकांनीही सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे सचिव श्री के संजय सर व प्रमुख पाहुण्या सौ के उषा मॅम यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे मार्गदर्शन पर विचार मांडले.
ऑनलाइन साजरा केल्या गेलेल्या या कार्यक्रमास शाळेतील सर्व विद्यार्थी, सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *