January 28, 2021

नेर येथे पत्रकारांच्या वतीने पत्रकार दिन साजरा

 

यवतमाळ /नेर प्रतिनिधी:- प्रेस संपादक तथा पत्रकार सेवा संघ नेर तालुक्याच्या वतीने 6 जानेवारीला मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकार दिन सोहळा साजरा करण्यात आला.
प्रेस संपादक तथा पत्रकार सेवा संघाचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष श्री. विजयकुमार बुंदेला यांच्याहस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन तथा पुष्पमाला अर्पण करण्यात येऊन सदर सोहळ्याची सुरुवात केल्या गेली. ह्यावेळी नेर येथील तालुका पत्रकारांच्या वतीने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार बुंदेला,संजुभाऊ सावरकर,मकसूद अली,सुकांत वंजारी,नगरसेवक ऍड.सलिम शहा,धांदे सर,सुभाष गायकवाड,धनंजय वानखडे आदी मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच मान्यवरांच्याच हस्ते कोरोना प्रतिरोधक फेस मास्क व साप्ताहिक लक्षभेदची दिनदर्शिका गोरगरिब बांधवांना वितरीत केल्या गेली.ज्येष्ठ पत्रकार बुंदेला व प्राध्यापक कानतोडे यांनी पत्रकार दिनाचे महत्त्व विशद करणारी समयोचित भाषणे केली.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या नेर येथील पत्रकार सतीश उरकुडे (तालुकाध्यक्ष),लक्ष्मण वानखडे (जिल्हा उपाध्यक्ष), राहुल मिसळे,मनिष मेश्राम,प्रमोद जाधव यांच्या व्यतिरिक्त मनोज झोपाटे,नवनाथ दरोई, हर्षवर्धन तायडे,किशोर अरसोड,शितल घावडे,मोहिनी तिघरकर ह्यांची उपस्थिती होती.नेर तालुका प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने ग्रामीण रुग्णालय नेर येथील कर्मचारी तथा रुग्णांना कोरोना प्रतिरोधक फेस मास्कचे वाटप करण्यात येवून ह्या सोहळ्याचा समारोप केल्या गेला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed