January 28, 2021

शिवराय चौक येथे राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी

 

यवतमाळ/दारव्हा प्रतिनिधी :- ज्या शूर स्त्री – पुरूषांनी आपल्या देशाचे नाव इतिहासात अजरामर केले अथवा ज्यांनी आपल्या कर्तबगारीने अनेक यशस्वी रण गाजवले ,त्यांच्या कृृत्याचे कितीही स्मरण केले तरी त्यांच्या ऋणातून सर्वस्वी मुक्त होणे कठिण आहे. राष्ट्रमाता ,राजमाता जिजामाता यांचा जन्मोत्सव साजरा करण्यामागे हीच कृतज्ञतेची भावना आहे.
सूमारे चारशे वर्षापूर्वी जिजामातेंच्या रूपाने मातृतिर्थ सिंदखेडराजाला अशी एक शक्ती जन्माला आली की जीने दृष्टांचे निर्दालन आणि सृष्टांचे संरक्षण करण्याची प्रेरणा दिली त्याच मातेची दिनांक १२ जानेवारी जयंती दारव्हा शहरातील अंबिका नगर येथील शिवराय ग्रूपच्या वतिने साजरी करण्यात आली तसेच यावेळी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला अंबिका नगरातील महिलांच्या हस्ते हार अर्पण करून केक कापुन जयंती आनंदात साजरी करण्यात आली यावेळी शिवराय ग्रूप चे संस्थापकीय अध्यक्ष परेश मनवर यांच्यासह नगरातील उर्मिला वाघडे, कल्पना वाघाडे, ज्ञानेश्वरी मनवर, जाया कांबळे, वंदना बलखंडे, अर्चना गावंडे, गीता चंदन ,माधुरी वाघाडे, सरोज शहाडे, रोशनी भुते, सुमन शहाडे, रेखा वानखडे, गौरी वाघाडे, श्रद्धा कांतोडे, टिना वाघाडे इत्यादी महिला तसेच शिवराय ग्रूप चे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed