गेल्या 24 तासात 11 पॉझिटिव्ह एक कोरोनामुक्त

गेल्या 24 तासात 11 पॉझिटिव्ह ; एक कोरोनामुक्त
जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1766 बेड उपलब्ध

यवतमाळ प्रतिनिधी :- दि. 04 जानेवारी : गेल्या 24 तासात जिल्ह्यात 11 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले तर एक जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात 24 व बाहेर जिल्ह्यात चार अशी एकूण 28 झाली आहे.
जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 942 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 11 अहवाल पॉझिटिव्ह असल्याने उर्वरित 931 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आज पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये पांढरकवडा येथील चार, पुसद येथील एक, राळेगाव येथील एक, वणी येथील दोन, यवतमाळ येथील दोन व इतर जिल्ह्यातील एक रूग्ण असून त्यात पाच महिला व सहा पुरूषांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 73004 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 71188 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1788 मृत्यूची नोंद आहे.


जिल्ह्यात आतापर्यंत सात लक्ष 86 हजार 904 चाचण्या झाल्या असून त्यापैकी सात लक्ष 13 हजार 801 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 9.28 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी 0.80 आहे तर मृत्यूदर 2.45 आहे.
जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1766 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 7 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 1769 आहे. यापैकी 3 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 1766 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 3 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 784 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 755 बेडपैकी पुर्ण 755 बेड शिल्लक आणि 7 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 227 बेडपैकी पुर्ण 227 बेड शिल्लक आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *