उमरखेड शहरात डॉक्टर वर गोळीबार डॉक्टर हनुमंत  धर्मकारे यांचा उपचारादरम्यान मृत्यू

 

उमरखेड शहरात डॉक्टर वर गोळीबार डॉक्टर हनुमंत  धर्मकारे यांचा उपचारादरम्यान मृत्यू


उमरखेड प्रतिनिधी:- उमरखेड शहरातील साखळे महाविद्यालयासमोर एका अज्ञात दुचाकीस्वारांना उमरखेड शहरातील डॉक्टर वर गोळीबार केलाय या गोळीबारात डॉक्टर धर्मकारे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे डॉक्टर हनुमंत धर्मकारे असं गंभीर जखमी होऊन मृत्यू झालेल्या डॉक्‍टरचं नाव उमरखेड येथील राजाराम उत्तरवार या शासकीय रुग्णालयात डॉक्टर हनुमंत धर्मकारे हे बाल रोग तज्ञ म्हणून कार्यरत होते नेहमीप्रमाणे ते रुग्णालयात जात असताना दुचाकीवरून आलेल्या एका अज्ञात तरुणाने त्यांच्यावर सपासप गोळीबार कडून चार गोळ्या झाडल्या डॉक्टर धर्म काळे हे घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याने नागरिकांनी धाव घेत त्यांना रुग्णालयात दाखल केले मात्र काही वेळातच उपचारादरम्यान डॉक्टर हनुमंत धर्मकारे यांचा मृत्यू झाला.

घटनास्थळी पोलिस पोहोचले असून गोळीबार करणार्‍या आरोपीचा शोध पोलीस घेत आहे घटनेचे गांभीर्य लक्षात घेतात पोलीस अधीक्षक डॉक्टर दिलीप भुजबळ पाटील हे उमरखेड ला रवाना झाल्याची माहिती मिळत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed