लहान भावाने केला मोठ्या भावाचा खून
सतत च्या त्रासाला कंटाळुन लहान भावने च केला मोठ्या भावाचा खून
घाटंजी तालुका प्रतिनिधी :- दारू पिण्यासाठी पैसे मागून आईला मारहाण का केली या कारणावरून लहान भावाने मोठ्या भावाचा खून केला आहे ही घटना घाटंजी शहराला लागून असलेल्या घोटी येथे घडली आहे दीपक ज्योतिराम गेडाम असे मृत झालेल्या युवकाचे नाव आहे.
दीपक याला लहानपणापासून दारूचे व्यसन होते तो दारू पिण्यासाठी नेहमीच घरातील सदस्यांना पैशाची मागणी करीत होता अशातच त्याने दारू पिण्याकरिता त्याच्या आईला पैशाची मागणी केली आईने पैसे देण्यास नकार दिल्याने दिपकने आईला जबर मारहाण केली दीपक च्या आईने दीपक ने दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने मारहाण केल्याचे दीपकचा लहान भाऊ दिलीप याला सांगितले आईला मारहाण केली म्हणून संतापलेल्या दिलीपने दीपक च्या गळ्यावर व मानेवर सपासप वार करून गंभीर जखमी केले या घटनेची माहिती घाटंजी पोलिसांना मिळताच पोलिसांनी दिपकला घाटंजी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आले अशातच उपचारादरम्यान दीपकचा मृत्यू झाला घाटंजी पोलीसांनी दीपक चा लहान भाऊ दिलीप ज्योतिराम गेडाम याला ताब्यात घेऊन अटक करून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास घाटंजी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनीष दिवटे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय सिडाम करीत आहे