स्मारकाचे कोटयावधी हडपणा-या किरीट सोमय्या विरोधात शिवसैनिकांचा संताप

किरीट सोमय्याचे पोस्टर्स चपलीने तुडविले, देशद्रोहाचा गुन्हा दाखल   करण्याची मागणी

प्रतिनिधी यवतमाळ :- भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आयएनएस विक्रांतचे संग्रहालय उभारण्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपये हडपले असून त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आज शिवसेनेच्या वतीने करण्यात आली. देशप्रेमाचा आव आणणा-या देशद्रोही भाजप नेत्याने थेट स्मारकातील कोटयवधी रुपये हडपल्याने शिवसैनिकांचा संताप अनावर झाला व शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांचे पोस्टर्स चपलेने तुडविले. दत्त चौकात झालेल्या या आंदोलनात मोठया प्रमाणात शिवसैनिकांनी सहभागी होत आपला संताप व्यक्त केला.

यवतमाळ येथील दत्त चौकात दुपारी झालेल्या या आंदोलनात शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरत आक्रमक आंदोलन केले. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आधी किरीट सोमय्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर त्यांच्या पोस्टर्सला चपलेने तुडविण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी  “भाजपा हमसे डरती है, इडी को आगे करती है” अशा घोषणा देऊन परीसर दणाणून सोडला. शिवसेना नेते संजय राऊत यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत किरीट सोमय्या यांनी आयएनएस विक्रांतच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा निधी जमवून तो स्वतःच्या घशात घातल्याचा गंभीर आरोप केला. त्याचे पडसाद आज यवतमाळ जिल्हयात उमटले. याप्रसंगी शिवसेनेच्या पदाधिका-यांनी भाषणातुन आपला रोष व्यक्त केला. कधी स्मारकाच्या नावाखाली तर कधी राम मंदीराच्या नावाखाली भाजपाचे नेते देशातील पैसे लुटत आहे. सरदार पटेल यांच्या स्मारकाच्या वेळी देशभरातील लोखंड जमा करीत भाजपा नेत्यांनी पैसे खाल्ले. हिंदुत्वाच्या नावाखाली जनतेच्या खिशावर दरोडा टाकण्याचे काम भाजपा नेते करीत असल्याची टिका शिवसेना जिल्हाप्रमुख राजेन्द्र गायकवाड यांनी केली. केन्द्रीय तपास यंत्रनांचा वापर करीत भाजपा शिवसेनेच्या नेत्यांना टारगेट करीत आहे. ज्या राज्यात भाजपाचे सरकार नाही तिथे ईडी अथवा सीबीआय चा वापर केला जात आहे. केन्द्र सरकारच्या विरोधात बोलणा-यांना नोटीस देऊन त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. एकीकडे भ्रष्टाचाराच्या नावाखाली दडपशाही चालविणा-या आणि दुसरीकडे स्मारकाचे कोटयवधी रुपये हडपणा-या किरीट सोमय्या यांच्या विरोधात आता देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालाच पाहीजे अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पराग पिंगळे यांनी लाऊन धरली. राज्यातील ईडीचे कार्यालय भाजपाचे झाले आहे. ईडीच्या माध्यमातून शिवसेना नेत्यांना त्रास देण्याचा एक कलमी कार्यक्रम सुरु आहे. त्यामुळे हा प्रकार असाच सुरु राहील्यास महाराष्ट्रात आंदोलन पेटवू असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख विश्वास नांदेकर यांनी दिला. ईडीच्या माध्यमातून आमचे श्रध्दास्थान असलेल्या मातोश्री वर हल्ला केला जात आहे. भाजपा नेते जर ईडीचा बॉंम्ब वापरीत असेल तर आम्हाला सुध्दा मानवी बॉम्ब बनल्याशिवाय पर्याय राहणार नाही असा इशारा यवतमाळ विधानसभा मतदार संघाचे संपर्क प्रमुख संतोष ढवळे यांनी दिला. महाराष्ट्रात भाजपा शिवसेनेचे बोट धरुन मोठी झाली आणि आता गद्दारी वर उतरली आहे. ही गद्दारी आम्ही खपवून घेणार नाही. पुढील सर्वच निवडणूकीत आम्ही त्यांना त्यांची जागा दाखविणार असल्याचे वक्तव्य महिला आघाडी प्रमुख श्रीमती सागर पुरी यांनी केले.हया आंदोलनाला शिवसेना जिल्हा प्रमुख पराग पिंगळे,जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड,संपर्क प्रमुख मा.संतोष ढवळे,मध्यवर्ती बँक संचालक राजुदास जाधव,निवासी उपजिल्हा प्रमुख प्रवीण पांडे,उपसभापती,कृ.उ.बा.स व उपजिल्हा प्रमुख गजानन डोमाळे,उपजिल्हा प्रमुख किशोर इंगळे,जिल्हा समन्वयक गोपाळ पाटील,तालुका प्रमुख संजय रंगे, शहर प्रमुख नितीन बांगर,जिल्हा परिषद सदस्य सचिन राठोड,महिला आघाडी जिल्हा समन्वयक सागरताई पुरी,महिला आघाडी जिल्हा संघटिका निर्मलाताई विनकरे,महिला आघाडी संघटिका लता चंदेल,महिला आघाडी तालुका संघटीका मा.अंजलीताई गिरी,महिला आघाडी शहर संघटिका कल्पनाताई दरवाई,पंचायत समिती सदस्य गजानन पाटील,जिल्हा युवा अधिकारी विशाल गणात्रा,जिल्हा युवा अधिकारी डॉ प्रसन्न रंगारी,जिल्हा समन्वयक अमोल धोपेकर,उपजिल्हा युवा अधिकारी गिरीजानंद कळंबे,युवासेना तालुका युवा अधिकारी विजय इंगळे,तालुका युवा अधिकारी पवन शेंद्रे,शहर युवा अधिकारी
निलेश बेलोकर,शहर युवा अधिकारी भूषण काटकर,
जिल्हा युवती अधिकारी,रवी जाधव शहर प्रमुख बोरी,उपतालुका प्रमुख राजू धोटे,संदीप सरोदे,चंद्रकांत उडाखे विभाग प्रमुख गणेश आगरे,गणेश आगलावे,पुरुषोत्तम राठोड,विष्णू राठोड,गजानन राऊत,रमेश अग्रवाल,दशरथ शेजुळकर,दीपक उमरे,उद्धवराव साबळे,अविनाश बानोरे,कृष्णराव इरवे,राजाभाऊ गिरी,अरुण वाकळे,अनिल यादव,योगेश भांदक्कर,विनोद राऊत,पंकज देशमुख, प्रभाकर बहादुरे,पद्माकर काळे,आकाश जाधवर,शैलेंद्र तांबे,शाम थोरात,राजू राऊत,अभिजित बायस्कर, सतीश सकट, संजय कांबळे,प्रतीक पिंपळकर,ज्योती चिखलकर,गोलू जोमदे,रुपेश सरडे,गिरीश व्यास,संदीप देवकते,सागर गावंडे,राजेंद्र गावंडे,पवन पेटकर,सुजित मुनगीनवार,मनोहर राठोड,कुमार चव्हाण,पुरुषोत्तम टीचुकले,गजू राठोड,पंडित वासनिक,अर्पित घुगरे,निलेश लडके,अभिजित मुरके,संतोष चव्हाण,अशोक बोपचे तसेच शिवसेना,महिला आघाडी,युवासेना सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *