सुसंस्कार विद्या मंदिर येथे अवतरली पंढरी

सुसंस्कारच्या चिमुकल्यांनी साकारली पंढरपूर वारी

पंढरीची वारी करी वारकरी उन्ह पावसाची चिंता कोण करी
प्रतिवर्षी येणारी पंढरीची वारी, हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक लोकजीवनातील एक अत्युच्च आणि सर्वव्यापी आनंद सोहळा आहे. महाराष्ट्रीय जनविश्वाच्या लोकभावाची एक सांस्कृतिक अभिव्यक्ती म्हणजे पंढरीची वारी होय.


सिंघांनिया नगर स्थित सुसंस्कार विद्या मंदिर येथे आषाढी एकादशीचे औचित्य साधून पूर्व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांची पालखीसह दिंडी काढण्यात आली. याप्रसंगी सुसंस्कार विद्या मंदिर चे सचिव श्री. संजय सर , तसेच सुसंस्कार विद्या मंदिर च्या मुख्याध्यापिका सौ.उषा कोचे मॅम यांनी या दिंडीत विद्यार्थ्यांसह उत्साहाने सहभाग घेतला.


भारतीय संस्कृती ही सण, उत्सव व परंपरांनी परिपूर्ण आहे. अनेक सण उत्सव आपण साजरे करतो. ईश्वर भक्ती हे भारतीयांचे मुख्य कार्य आहे. ईश्वर ही एक शक्ति मानुन आपण त्यांची उपासना करीत असतो. त्या ईश्वराची आळवणी व उपासना महाराष्ट्रातले वारकरी संप्रदाय अत्यंत भक्तिभावाने व उल्हासाने करीत असतात.आधुनिक युगात यांत्रिकीकरणामुळे आजची पिढी कुठेतरी ईश्वर भक्ती यात कमी पडते की काय अशी भीती आपल्यामध्ये सदैव असते.


आधुनिक पिढीमध्ये महत्त्वाचा भाग म्हणजे तरुण व बालवर्ग या विचाराला लक्षात घेऊनच भारतीय संस्कृती व परंपरांचे पुरेसे ज्ञान प्राप्त व्हावे बालवर्गाला ईश्वराची आराधना भक्ती करण्याची इच्छा निर्माण व्हावी या उद्देशाने सुसंस्कार विद्या मंदिर येथे वारकऱ्यांच्या दिंडीचे आयोजन केले गेले

महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल व रुक्मिणी तसेच वारकरी यांच्यासह टाळ मृदंगाच्या गजरात सुमधुर भजनाच्या तालावर नाचणारे छोटे वारकरी बघून मनाला सगळ्यांनाच एक सुखद आनंद प्राप्त होत होता व बालवर्गाला देखील विठ्ठल अत्यंत आकर्षक व पारंपारिक वेशभूषा करून विठ्ठल रुक्मिणी तसेच वारकरी यांना साकारून त्यांच्याशी जवळील साधता आली

.याप्रसंगी पूर्व प्राथमिक विभागातील रेहांश कुंभारे यांनी विठ्ठल तर सानवी भैद हिने रुक्मिणी मातेची वेशभूषा साकारून आपल्याला विठ्ठल रुक्मिणीचे जणु दर्शन करुन दिले

तसेच सर्वच मुलं मुलीनी वारकऱ्यांचा आकर्षक अश्या वेषभुषा करित दिंडीत सहभाग घेतला,
याप्रसंगी शाळेचे सचिव श्री.के. संजय सर व मुख्याध्यापिका सौ.उषा कोचे मॅम यांनी परंपरा जोपासणे आजच्या बालवर्गाला व विदयार्थ्यांना किती आवश्यक आहे हे पटवून देताना ‘ईश्वर हे एक तेजश्री तत्त्व आहे जे आपल्याला सदैव सकारात्मक ऊर्जा प्रदान करते त्यामुळे त्यांच्या सहवासाला महत्त्व द्या’ तसेच वारीचे महत्व सांगताना वारी मधुन महाराष्ट्राची एकता बंधुभाव ह्या मधुन निर्माण होतात हे आपल्या मनोगता तून व्यक्त केले.
पालक वर्गाच्या भरभरून आणि उत्स्फूर्त प्रतिसादात अत्यंत भक्तीमय वातावरणात महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठलाची आषाढी एकादशी निमित्त काढलेल्या या दिंडीसाठी पूर्व प्राथमिक विभागातील मनीषा ठाकरे, प्रांजली कोचे, प्रांजली राखुंडे, स्वप्ना सोनटक्के व रोशन माहुरे या सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *