स्वयंसिध्दा योजनेचा लाभ घ्यावा – मा. प्रमुख न्यायाधीश श्री सुभाष रं. काफरे

 शहर प्रतिनिधी :- जिल्हा न्यायालय, यवतमाळ येथे स्वयंसिध्दा या योजनेची माहिती उपलब्ध करुन देण्याकरीता कौटुंबिक न्यायालय, यवतमाळ व जिल्हा वकील संघ यांच्या संयुक्त विदयमाने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

न्यायप्रविष्ठ महिलांसाठी कौटुंबिक न्यायालय, पुणे या ठिकाणी २०१७ साली स्वयंसिध्दा हा उपक्रम सुरु करण्यात आलेला आहे. महिलांचे आत्मसम्मान जागृत करणे व त्यांना कौशल्य प्रशिक्षण देणे आणि आर्थीक दृष्टया सक्षम होण्यासाठी मदत उपलब्ध करुन देऊन त्यांना स्वावलंबी बनविणे हा मुख्य हेतु असल्याने कौटुंबिक न्यायालय, यवतमाळ येथील मा. प्रमुख न्यायाधीश श्री सुभाष रं. काफरे यांनी पुणे कौटुंबिक न्यायालयात हा उपक्रम राबविलेला आहे. त्या ठिकाणी त्यांना सदर उपक्रमाच्या माध्यमातुन महिलांचे आर्थीक सक्षमीकरण झाल्याचे आढळुन आले असल्याने सदर उपक्रम कौटुंबिक न्यायालयातील प्रलंबित प्रकरणातील महिलांना या उपक्रमाचा योग्य तो फायदा व्हावा याकरीता नव्याने सुरु करण्यात येत आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष अँड. श्री अमीत बदनोरे, अध्यक्ष, जिल्हा वकील संघ, यवतमाळ तर प्रमुख अतिथी म्हणुन कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश मा. श्री सुभाष रं. काफरे हे होते, या कार्यक्रमास मार्गदर्शक म्हणुन लाभले होते. यावेळी स्वयंसिध्दा या योजनेच्या माध्यमातुन ज्या स्त्रीयांचे प्रकरण कौटुंबिक न्यायालयात प्रलंबित आहेत व त्यांना या योजनेच्या माध्यमातुन स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण अशा प्रकारे दिल्या जाऊ शकते याबाबत ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार व्दारा पुरस्कृत आणि सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया व्दारा संचालीत सेंट ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, यवतमाळ यांचे संचालक विजयकुमार भगत यांनी उत्तम मार्गदर्शन व संस्थेमध्ये चालणा-या प्रशिक्षणाची माहिती दिली. कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश मा. श्री सुभाष रं. काफरे यांनी या योजनेचे महत्व पुणे येथे कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश असतांना विविध खटले चालवितांना लक्षात आल्याचे सांगितले त्यामुळे या योजनेची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचावी या उद्देशाने जिल्हा वकील संघाच्या माध्यमातुन सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते व या प्रसंगी स्वयंसिध्दा या योजनेची माहिती दर्शविणा-या फलकाचे अनावरण कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश मा. श्री सुभाष रं. काफरे व जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अँड. श्री अमीत बदनोरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले व महिला पक्षकारांनी या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.
जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अँड. श्री अमीत बदनोरे यांनी आपण समाजाचे देणे लागतो हि भावना अतिशय महत्वाची असल्याने या योजनेचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कौटुंबिक न्यायालयाच्या विवाह समुपदेशक श्रीमती ज्योती माटे यांनी तर संचालन अँड. मनोज इंगोले यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता सचिव अँड. आशिष तोटे, अँड. संदिप गुजरकर, अँड. अजय डाखोरे, अँड. सुमित कांबळे, अँड. युवराज धांदे, अँड. मयुरी मडावी यांनी प्रयत्न केले.
याप्रसंगी जिल्हा वकील संघाचे सर्व सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *