सुकळी येथे चारित्र्यावर संशय घेत पतीने केली पत्नीची हत्या
आर्णी तालुका प्रतिनिधी :- आर्णी तालुक्यातील सुकळी येथे चारित्र्यावर संशय घेत खुद्द पतीनेच पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची खळबजनक घटना घडली आहे
सविता विनोद कथलेवाड वय वर्ष २६ रा. सुकळी असे मृतक पत्नीचे नाव आहे.
तर विनोद चंद्रभान कथलेवाड वय वर्ष ३३ असे आरोपी पतीचे नाव आहे.
दिनांक ३१ जुलै ला रात्री १० च्या दरम्यान चारित्र्याच्या संशयावरून
दोन्ही पती पत्निमध्ये वाद झाला असता आरोपी पतीने मृतक पत्नीला जमिनीवर दोरीच्या साहाय्याने गळा आवळला त्यानंतर पलंगावर ठेऊन हाताने गळा आवळला असता यात पत्नी मृत्यूमुखी पडली त्याच्या वर चादर टाकून दिले व रात्र भर आपल्या दोन मुलीसह आरोपी घरातच झोपला सकाळी ५ च्या सुमारास उठून आर्णी पोलिस स्टेशन गाठून हत्या केल्याची कबुली देत स्वतः ला आर्णी पोलिसांच्या स्वाधीन केले आर्णी पोलिस स्टेशनचे ठाणेदार पितांबर जाधव यांनी आपल्या पोलिस कर्मचा-यांसह घटना स्थळ गाठून पंचनामा केला व शव विच्छेदन करिता पाठविले आहे.
तसेच उप विभागीय पोलिस अधिकारी आदित्य मिरखेलकर यांनी ही घटना स्थळी भेट दिली.
पुढील तपास सुरू आहे
बातमी लीहे पर्यंत आरोपी वर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
मृतक पत्नीला एक सात वर्षाची व एक ४ वर्षाची असे एकूण २ मुली आहे