शिवशक्ती दुर्गा उत्सव मंडळाचा अभिनव उपक्रम,हुबेहूब साकारली न.प. व जी.प. शाळा

 

शहर प्रतिनिधी :- यवतमाळ शहरातील विठ्ठलवाडी परिसरातील शिवशक्ती दुर्गोस्तव मंडळाचा अभिनव उपक्रम सध्या खूप जोरदार चर्चेचा विषय ठरला आहे

मंडळांनी जिल्हा परिषद व नगरपरिषद च्या प्राथमिक मराठी शाळांचा देखावा हुबेहूब साकारले आहेत हा उपक्रम राबविण्यासाठी कलकत्ता येथून कारागिरांची टीम बोलविण्यात आली आहे शाळेचा संपूर्ण देखावा थाटून यामध्ये दुर्गादेवी शिक्षिकेच्या भूमिकेत तर गणपती व इतर विद्यार्थी विद्यार्थी चे भूमिकेत साकारलेले आहे प्राथमिक शाळेत ज्याप्रमाणे सर्व भौगोलिक रचना असते त्याप्रमाणेच संपूर्ण देखावा करण्यात आली आहे याशिवाय शाळेतील विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा शिकविण्याचा कल्लोळ ज्याप्रमाणे असतो तशा ध्वनी उत्पन्न केलेले आहेत त्यामुळे एकंदरीत जिल्हा परिषद व प्राथमिक मराठी शाळेचे हुबेहूब सादरीकरण झाले आहे सदर देखावा निर्माण करण्याचे कारण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद व प्राथमिक मराठी शाळांचे महत्त्व पटवून देण्याचे सांगितले आहे

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *