February 22, 2024

जिल्ह्यात अधिसुचना लागू करून समप्रमाणात विमा भरपाई द्या.

जिल्ह्यात अधिसुचना लागू करून समप्रमाणात विमा भरपाई द्या
शिवसेना उबाठाचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

 

यवतमाळ :-  जुलै महिण्यात झालेली अतिवृष्ठी, त्यानंतर 20 ते 22 दिवस पावसाचा खंड व सोयाबीन पिकांवर आलेल्या येलो मोसॅकामुळे पीकाचे झालेले 80% नुकसान तसेच अवकाळी पावसामुळे कापूस, तूर, चणा, गहू पीकाचे झालेले 75% नुकसान, याबाबत जिल्ह्यालीत सर्व मंडळासाठी अधिसुचना लागू करून शेतकऱ्यांना तातडीने कंपनीने घेललेल्या जोखीम स्थरानुसार समप्रमाणात विमा भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
या वर्षी जुलै महिन्यात 316 मी.मी. पेक्षा जास्त पाऊस 24 तासात पडून मोठी अतीवृष्ठी झाली. त्या नंतर ऑगस्ट  महीन्यात पावसाचा 20 ते 25 दिवस खंड पडला सोयाबीन पीक काढणीच्या एक महीच्या आधी येलो मोझॅकमुळे सोयाबीन पीकाचे सुध्दा 8०% नुकसान झाले. तीनही वेळा पीकाचे नुकसान झाल्यामुळे नुकसानग्रस्थ मंडळामध्ये पीक विमा भरपाई मिळणे साठी अधिसुचना लागू करण्याची संधी असताना सुध्दा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी विमा कंपनीशी आर्थीक हातमिळवणी करून कंपनीचे पैसे वाचविण्यासाठी शासन निर्णयाचा भंग करित अधिसुचना लागू करणेसाठी प्रस्ताव दिला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात पीकाचे नुकसान होऊन सुध्दा शेलकऱ्यांना विमा भरपाई पासुन वंचित ठेवले गेले. असा आरोपी यावेळी तालुका प्रमुख संजय रेंगे यांनी केला आहे. त्यामूळे जिल्ह‌्यातील सर्व मंडळा नुसार पीक विमा काढलेल्या 8 लाख 44 हजार शेतकऱ्यांना विमा कंपनीने जोखीम घेतलेले 3172 कोटी रूपयेची रक्कम सम प्रमाणात भरपाई म्हणून सरसकट देण्यात यावी, अश्या प्रकारची अधीसुचना तातडीने लागू करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संतोष ढवळे,उपजिल्हाप्रमुख किशोर इंगळे, गजानन डोमाळे, शिवसेना तालुकाप्रमुख संजय रेंगे, गजानन पाटील, चेतन शिरसाट, अक्षय ठाकरे, संतोष गदई, विजय राठोड आदी उपस्थित होते.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed