सुसंस्कार विद्यामंदिर येथे “दहावी नंतर काय?”या विषयांतर्गत ऋषिकेश परमा यांचे मार्गदर्शन सत्र

यवतमाळ प्रतिनिधी:- सिंघानिया नगर स्थित सुसंस्कार विद्यामंदिर येथे *”दहावी नंतर काय?* What after 10th या विषयावर श्री ऋषिकेश परमा सर यांचे मार्गदर्शन पर सत्राचे आयोजन केल्या गेले.

या कार्यक्रमाला सुसंस्कार विद्यामंदिर चे सचिव श्री.के संजय सर व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. के.उषा मॅम यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री ऋषिकेश परमा सर हे बेल्जियम स्थित असून यांनी यांनी M.Sc (Maths) केले असून IIT येथे कार्यरत होते. परमा सर यांनी अनेक विषयांवर मार्गदर्शन केले दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या या मार्गदर्शन पर सत्रात त्यांनी करिअर नियोजन करण्याची आवश्यकता का आहे ? करिअर कसे निवडावे ? करिअर अंतर्गत येणारे विविध क्षेत्र जसे विज्ञान वाणिज्य कला यामध्ये करिअर निवडताना होणारा लाभ व त्यातील उणिवा याबद्दल मार्गदर्शन ऋषिकेश सरांनी केले त्यांच्या मार्गदर्शनात त्यांनी शिक्षणाधरीत करिअर व कला गुण आधारित करियर याची माहिती दिली. करिअर निवडताना सर्व प्रथम स्वतःची ओळख होणे आवश्यक आहे भविष्यात काय व्हायचे आहे हा विचार न करता स्वतः मधील गुण ओळखून करिअर निवडावे. आत्मविश्वास असावा मात्र गर्व नसावा करिअर निवडताना आनंद प्राप्त करून देणारे करिअर निवडावे अशा अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यावर सरांनी आपल्या भाषणाद्वारे प्रकाश टाकला. शाळेचे सचिव श्री.के संजय सर व मुख्याध्यापिका उषा मॅडम यांनी विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन आपले भविष्य उज्वल करावे असे मौल्यवान विचार मांडले. या विद्यार्थी केंद्रित महत्त्वपूर्ण मार्गदर्शन सत्राचे सूत्र संचालन वर्ग दहावीची विद्यार्थिनी कु.शर्वरी वरुडकर तसेच आभार प्रदर्शन वर्ग दहावीची विद्यार्थिनी कुमारी पल्लवी बिसेन हिने केले या कार्यक्रमाच्या वर्ग दहावीचे सर्व विद्यार्थी तसेच शाळेतील सर्व शिक्षक वृंद यांनी लाभ घेतला.
मा.संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *