सावित्रीबाई फुले स्त्रियांसाठी एक मोठा विचार आहे .ॲड. क्रांती धोटे

यवतमाळ प्रतिनिधी:- आज 3 जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त यवतमाळ जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसने “महिला शिक्षण दिन ” मोठ्या उत्साहाने साजरा केला. यावेळी बोलताना क्रांती ताई यांनी सावित्रीबाई फुले या एक स्त्रियांसाठी एक आदर्श असल्याबाबतचे त्या म्हणाल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीचा हा दिवस महा विकास आघाडी सरकार तर्फे ‘ महिला शिक्षण दिन ‘ म्हणून संपूर्ण महाराष्ट्र साजरा करण्यात येत आहे. जिजामातेच्या व सावित्रीबाईंच्या प्रतिमेला अभिवादन करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे ठिकाणी प्रकाशाचे प्रतिक म्हणून पणतिची पूजा करण्यात आली .त्यानंतर बिकट परिस्थितीतून आलेल्या महिलांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या व समाजासाठी चांगली कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला . या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष श्री बाळासाहेब कामारकर उपस्थित होते त्यांनी महिलांना जिल्हा परिषदेच्या विविध योजनांची माहिती दिली. शासनांनी महिलासाठी अनेक प्रकारच्या योजना आणल्या आहेत .परंतु त्या योजनांचा लाभ गरजून पर्यंत पोहोचवायचे काम महिला राष्ट्रवादी काँग्रेस च्या माध्यमातून व्हावे ,अशी इच्छा व्यक्त केली .योजनांची सविस्तर अशी माहीती उपस्थित असलेल्या ग्रामीण व शहरी भागातील स्त्रीयांना दिली. कार्यक्रमाचे आयोजन महिला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष क्रांती धोटे राऊत यांनी केले होते. जिल्हा परिषदेच्या विविध योजना महिलांपर्यंत पोहोचाव्यात या अनुषंगाने सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त, हा कार्यक्रम राष्ट्रवादीच्या आर्णी रोड स्थित कार्यालयात आयोजित करण्यात आला. बचत गट तसेच समाजातील इतर गजू महिलांनी महाराष्ट्र सरकारच्या या योजनेचा घ्यावा असे आव्हान जिल्हाध्यक्ष क्रांती राऊत यांनी केले आहे. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सन्माननीय बाळासाहेब कामारकर , क्रांती राऊत, लालजी राऊत ,अशोकराव भोंगे ,पांडुरंग चव्हाण, शहराध्यक्षा गौरी ताई उजवणे , रंजनाताई आडे यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी व भगिनी उपस्थित होत्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *