यवतमाळ जीवन प्राधिकरणाचा कारभार लेखापाल गोपाल जीवनेच्या भरोशावर —— कर्मचाऱ्यांचा आरोप

 

विविध मागण्यासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन

यवतमाळ प्रतिनिधी:- यवतमाळ जीवन प्राधिकरणाचा कारभार संपूर्ण ढेपाळला असून जीवन प्राधिकरणाच्या मनमानी कारभारामुळे यवतमाळकर जनता त्रस्त आहे, आता जीवन प्राधिकरण यवतमाळ येथे कार्यरत असलेले सर्व कंत्राटी कर्मचारी थकबाकी वेतन न मिळाल्याने काम बंद आंदोलन करीत उपोषणाला सुरुवात केली आहे, याबाबत जीवन प्राधिकरणाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता जीवन प्राधिकरणाचे संपूर्ण काम हे लेखापाल गोपाल जीवने संभाळत असल्याचे त्यांनी सांगितले जीवने हे कंत्राटी कर्मचाऱ्यांचे संपूर्ण वेतन कंत्राटदाराकडून घेतात मात्र आम्हाला तुटपुंजे मानधन देऊन लेखापाल गोपाल जिवणे मोकळे होतात असा आरोप जीवन प्राधिकरणाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी केला आहे या संपूर्ण प्रकारा बाबत महाराष्ट्र लाईव्ह न्युज ने जीवन प्राधिकरणाचे लेखापाल गोपाल जीवने यांना माहिती विचारली असता मी कोणतीही मुलाखत आपणास देऊ शकत नाही, मी कोणाचा फोन उचलत नाही, माझा फोन हा मी विकत घेतलेला आहे, तो मला शासनाने दिलेला नाही असे उत्तर त्यांनी दिले आहे हा प्रकार पाहिल्यावर कंत्राटी कर्मचाऱ्यांनी केलेले सर्व आरोप खरे आहे की काय असा प्रश्न निर्माण होत आहे?

यवतमाळ जीवन प्राधिकरण कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असते,आता चर्चेत आला आहे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या तीन महिन्यापासून थकबाकी वेतन न मिळाल्याने, जीवन प्राधिकरण ने कर्मचारी नियुक्त करण्यासाठी एका ठेकेदाराला कंत्राट दिले ते कंत्राट फक्त नावालाच दिले असून कंत्राटदारास सोबत गोपाळ जीवने यांनी हात मिळवणी करून अर्धे तुम्ही अर्धे आम्हीचा पवित्रा अवलंबवील्याचा क गंभीर आरोप सुद्धा यावेळी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी केला आहे,

नियमानुसार कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा व्हायला पाहिजे मात्र जीवन प्राधिकरणाच्या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगार हे जीवने हातात देतात, नियमानुसार सर्व कर्मचाऱ्यांना दहा हजाराच्या वर पगार आहे,मात्र जीवने हे कोणाला तीन हजार तर कोणाला सहा हजार असे पगार देतात,हा संपूर्ण प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नजरेखालून सुरू असल्याचे जीवन प्राधिकरण कार्यालयातच बोलले जाते मात्र याची वाच्यता कुठेही होत नाही कंत्राटी कर्मचाऱ्यांना हा प्रकार असह्य झाल्यामुळे त्यांनी बाहेर काढला आहे,

जीवन प्राधिकरणाच्या काही कंत्राटी कर्मचाऱ्यांचे एक ते दीड लाख रुपये सुद्धा ठेकेदारांकडे बाकी आहे व त्यांना इतर सुविधाही आजपर्यंत मिळाल्या नाही, वेतन का मिळाले नाही म्हणून कर्मचाऱ्यांनी विचारले असता ठेकेदारांनी तीन कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे, कमी करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर घ्यावे व नियमानुसार कर्मचाऱ्यांना वेतन मिळावे जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी या मागण्या पूर्ण होत पर्यंत जीवन प्राधिकरणाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलन सुरूच राहणार असल्याचे यावेळी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *