पेट्रोल दरवाढी विरुध्द शिवसैनिक उतरले रस्त्यावर

बैलबंडी तसेच घोडागाडीने वेधले यवतमाळकरांचे लक्ष

 

प्रतिनिधी यवतमाळ:- केंन्द्र सरकारच्या तुघलकी धोरणामुळे पेट्रोल तसेच डिझल चे भाव गगनाला भिडले आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरीकांचे कंबरडे मोडले असून मोठया प्रमाणात वस्तुंची दरवाढ होत आहे. दरम्यान आज खासदार भावनाताई गवळी यांच्या सुचनेनुसार यवतमाळात शिवसैनिक रस्त्यावर उतरले. शिवसेनेच्या वतीने काढण्यात आलेल्या मार्च मधील बैलबंडी तसेच घोडागाडीने नागरीकांचे लक्ष वेधून घेतले.

 

डिझल चे दर ऐंशी च्या पार तर पेट्रोलचे दर नव्वदीच्या च्या पार गेले आहे. महाराष्ट्रातही गेले काही आठवडे सातत्याने इंधनाची दरवाढ होत आहेसरकार इंधन दरवाढीवर कोणतेही नियंत्रण आणताना दिसत नाहीपरिणामी नागरिकांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे पेट्रोलडिझेलचे दर वाढल्याने महागाईही वाढत आहेत्यात सामान्य माणूस होरपळला जात आहेपरिणामी शुक्रवारी इंधन दरवाढीविरोधात उद्रेक झालाशिवसेना पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे यांच्या आदेशाप्रमाणे तसेच खासदार भावनाताई गवळी यांच्या सुचनेनुसार यवतमाळ शहरातील शिवसैनिक रस्त्यावर उतरले. दुपारी बारा वाजता सर्व शिवसैनिक स्थानिक तहसिल चौकात एकत्रित झाले. येथून शिवसैनिकांनी दत्त चौकापर्यन्त मार्च काढला. यामध्ये अनेक शिवसैनिक बैलबंडी तसेच घोडागाडी घेऊन सहभागी झाले होते. याप्रसंगी शिवसैनिकांनी केन्द्र सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. या घोषणाबाजीमुळे तसेच मार्च मधील बैलगाड्यांनी नागरीकांचे लक्ष वेधून घेतले. नागरीकांनी सुध्दा या मार्च चे जागोजागी स्वागत करुन आमचाही या आंदोलनाला पाठींबा असल्याचे सांगीतले. दत्त चौकात या मार्च ची सांगता करण्यात आली. याप्रसंगी आंदोलनात शिवसेना विधानसभा संपर्कप्रमुख संतोष ढवळे, शिवसेना शहरप्रमुख पिंटू बांगर, वसंतराव कंगाले, गुणवंत ठोकळ, दिगांबर मस्के, वसंत जाधव, तालुका प्रमुख, सुरेश ढेकळे, मनीष लोळगे, सचिन अजमिरे, दिनेश इंगळे, भूषण काटकर, अतुल गुल्हाणे, पवन शेंद्रे, विनोद राऊत, विशाल चव्हाण, आशिष ढोले, पुडके काका, इरवे काका, सुरेश चुणारकर, संतोष सोनकुसरे, मंदाताई गुदडे, पुष्पा जाधव, चंदू केलटकर, विक्रम लाकडे, विकास गर्जे, विनोद काकडे तालुका प्रमुख राळेगाव, राकेश राऊळकर, शहरप्रमुख, संदीप पेंदोर, उपशहर प्रमुख, प्रशांत वारहेकार, उपतालुका प्रमुख, शेषराव ताजने, उपतालुका प्रमुख, सुरेंद्र भटकर, उपतालुका प्रमुख, योगेश मेलोंडे, युवासेना शहरप्रमुख, अमोल राऊत, युवासेना तालुका प्रमुख, रोशन गोरे, शिवानंद मेसनसुरे, योगेश मेलोंडे, शशी खोडके, प्रमोद कोरडे सहभागी झाले होते.

 

सरकारने अंत पाहू नये

 

वाढत्या पेट्रोल तसेच डिझल दरवाढीने सर्वसामान्य नागरीक त्रस्त झाले आहे. पेट्रोल डिझल दरवाढीमुळे इतर वस्तुंच्या वाहतूकीचा खर्च वाढून सर्वच वस्तुंच्या किंमती वाढत आहे. या दरवाढीला केन्द्र सरकारचे चुकीचे धोरण जबाबदार आहे. सरकारने आमचा अंत पाहू नये अन्यथा सर्वसामान्य नागरीकांचा संयम सुटल्याशिवाय राहणार नाही.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *