September 23, 2021

रासायनीक खतांच्या वाढलेल्या किंमती कमी करा ! मा.पंतप्रधान व केंद्रीय कृषीमंत्री यांच्याकडे खा.भावनाताई गवळी यांची मागणी

प्रतिनिधी यवतमाळ:- एैन खरीप हंगामाच्या तोंडावर खतांच्या किंमती वाढविण्यात आल्या आहे. यामुळे आधीच अडचणीत असलेला शेतकरी आनखी डबघाईस येणार आहे. त्यामुळे वाढलेल्या खतांच्या किंमती कमी करण्याची मागणी खासदार भावनाताई गवळी यांनी पंतप्रधान मा. नरेंन्द्र मोदी व केंद्रीय कृषीमंत्री यांच्याकडे केली आहे.

देशातील शेतकरी गेल्या तीन वर्षापासून कुठे अतीवृष्टी तर कुठे दुष्काळ सदृष्य परीस्थीती अशा नैसर्गीक आपत्तीमुळे संकटात आला आहे. गेल्या एक ते सव्वा वर्षापासून कोविड-19 कोरोना संकटामुळे देश  राज्य पातळीवर सुरू असलेल्या टाळेबंदीमुळे शेतकऱ्यांने अत्यंत मेहनतीने पीकविलेल्या शेतातील भाज्याफळेफुले यासह इतर पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहेशासनाकडून शेती पिकांचे झालेले नुकसान भरपाई ही शेतकऱ्यांच्या नुकसानाच्या प्रमाणात पुरेशी नव्हती. पिकविमा कंपन्यांनीही शेतकऱ्यांच्या पिकाच्या झालेल्या नुकसानाचे थातूरमातूर सर्वेक्षन करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली नाहीत्यातच हया वर्षी केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या रासायणीक खतांच्या कंपन्यांनी रासायनीक खतामध्ये जवळपास 60 टक्यापर्यंत वाढ केलेली आहे.

 

सततच्या नैसर्गीक संकटाला तोंड देणारा शेतकरी खरीप पिकांचे निसर्गाच्या अवकृपेमुळे नुकसान झाल्यास रब्बी पिकाकडे आस लावून असतो पण मागील वर्षी देशाच्या विविध क्षेत्रात झालेल्या अवकाळी पाऊस  गारपीटीमुळे रब्बी पिकांचे सुद्धा शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले त्यातच जगासह देशपातळीवर असलेल्या कोरोना संकटामुळे शेतकऱ्यांची भाजीपाल्याची  फळाची पिके शेतातच कुजलीत. अशात विविध प्रकारच्या आर्थीक संकटांना देशातील शेतकरी तोंड देत असतांना काही दिवसावर येवून ठेपलेल्या पावसाळ्याच्या तोंडाशी केंद्र शासनाच्या अखत्यारीत येत असलेल्या रासायनीक खतांच्या किंमतीत प्रचंड प्रमाणात केलेल्या वाढीमुळे देशातील शेतकरी शेतीचे नियोजन करीत असतांना प्रचंड प्रमाणात आर्थीक संकटात सापडेला आहेत्यामुळे नैसर्गीक आपत्ती  कोरोना संकटामुळे आर्थीक अडचणीत आलेल्या देशातील शेतकयांच्या आर्थीक अडचणींचा विचार करून केंद्र शासनाच्या कार्यकक्षेत येणाऱ्या रासायणीक खत कंपन्यांनी वाढविलेले दर कमी करावे या करीता माखाभावनाताई गवळी यांनी प्रधानमंत्री मानरेंद्रजी मोदी  केंद्रीय कृषीमंत्री मानरेंद्रजी तोमर यांना खतांच्या वाढलेल्या किंमती कमी करण्याची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *