November 29, 2021

बालमेंदूरोग राष्ट्रीयस्तरावरील परिषद तसेच यवतमाळ बालरोगतज्ञ संघटनेचा पदग्रहण सोहळा संपन्न

अध्यक्षपदी डॉ. अजय केशवानी तर सचिवपदी डॉ. स्वप्नील मानकर

यवतमाळ प्रतिनिधी:-यवतमाळ बालरोगतज्ञ संघटना यांचा 2021-22 या वर्षाकरिता पदग्रहण समारंभ 3 ऑक्टोबर 2021 रोजी वसंतराव नाईक मेडिकल कॉलेज यवतमाळ येथे पार पडला, सोबतच राष्ट्रीय स्तरावरील बाल मेंदूरोग (पेडियाट्रिक न्यूरोलॉजी) ची कॉन्फरन्स सुद्धा पार पडली. या कॉन्फरन्समध्ये संपूर्ण भारतातील प्रसिद्ध बाल मेंदू रोग तज्ञ यांनी आपले मोलाचे मार्गदर्शन केले त्यामध्ये प्रामुख्याने बालमेंदूरोग संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.शेफाली गुलाटी दिल्ली , प्रसिद्ध मेंदूरोग तज्ञ डॉ.अनुप वर्मा रायपुर , डॉ. सतीश देवपुजारी नागपुर, डॉ.ऋतुराज देशमुख अमरावती, डॉ. अमरजीत वाघ नागपूर डॉ. संजीव जोशी, डॉ. हर्षल राठोड डॉ. अनिल उमरे यवतमाळ तसेच डॉ. जयंत पांढरीकर, डॉ विंकी रघवानी यांची प्रमुख उपस्थिती होती, भारतीय बाल मेंदू रोग तज्ञ संघटना यांचे राष्ट्रीय सचिव डॉ. संजीव जोशी यांच्या पुढाकाराने ही कॉन्फरन्स घेण्यात आली. अशा प्रकारची एवढी मोठी कॉन्फरन्स यवतमाळमध्ये होण्याचा हा पहिला योग आहे
त्यानंतर लगेचच यवतमाळ बालरोगतज्ञ संघटनेचा पदग्रहण समारंभ पार पडला यामध्ये मावळते अध्यक्ष डॉ. वीरेंद्र राठोड मावळते सचिव डॉ. सारंग तारक यांच्याकडून डॉ. अजय केशवाणी आणि डॉ. स्वप्नील मानकर यांनी नवीन अध्यक्ष व सचिव म्हणून पदभार स्वीकारला या पदग्रहण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून तसेच इंस्टॉलींग ऑफिसर म्हणून नागपूरचे प्रसिद्ध डॉ. सतीश देवपुजारी हे होते भारतातील प्रसिद्ध बाल मेंदू रोग तज्ञ डॉक्टर अनुप वर्मा रायपुर हे प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमाला उपस्थित होते तसेच महाराष्ट्र बालरोगतज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर जयंत पांढरीकर यांची प्रमुख उपस्थिती होती या सोबतच महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे उपाध्यक्ष डॉक्टर विंकी रघवाणी यांचे सुद्धा या पदग्रहण सोहळ्यात मोलाचे मार्गदर्शन लाभले, यवतमाळ मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉक्टर मिलिंद कांबळे यांनी हजर राहून कार्यक्रमाची शान वाढवली.
कार्यक्रमाची सुरुवात मावळते अध्यक्ष डॉ.वीरेंद्र राठोड यांच्या स्वागतिय भाषणाने झाली त्यानंतर मावळते सचिव डॉ. सारंग तारक यांनी त्यांच्या कारकिर्दीत केलेल्या वेगवेगळ्या कामांचा आढावा ठेवला तसेच त्यांना मागील वर्षी राष्ट्रीय स्तरावरील सात पुरस्कार सुद्धा मिळाले आहे या गोष्टीचे सर्वांनी अभिनंदन केले डॉ.अजय केशवाणी यांनी पदभार स्वीकारून मनोगत मांडताना आपल्या कारकिर्दीमध्ये खूप सारे सामाजिक उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त केला, त्यामध्ये प्रामुख्याने लहान मुलावरील हृदयरोग शस्त्रक्रिया मोफत करणे आणि सिकलसेल थॅलेसेमिया च्या मुलांकरिता वेगळा वार्ड उपलब्ध करून देणे इत्यादींचा समावेश होता, उपस्थित असलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांनी आपले मत व्यक्त करताना मोलाचे मार्गदर्शन केले ,
कार्यक्रमाचे उत्तम संचालन डॉ. रुपाली साळवे, डॉ. संजना लाल, डॉ. स्वाती पाटील व डॉ. प्रीती यांनी केले,
आभार प्रदर्शन संघटनेचे सचिव डॉ. स्वप्नील मानकर यांनी केले,
कार्यक्रमाला रोटरी क्लब, लायन्स क्लब,जेसीज, निमा डेंटल असोसिएशन, होमिओपॅथि असोसिएशन इत्यादी वेगवेगळ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती

संघटनेची नवीन कार्यकारणी खालील प्रमाणे आहे
अध्यक्ष:- डॉ. अजय केशवाणी, सचिव डॉ. स्वप्नील मानकर , कोषाध्यक्ष डॉ. जबीह खान , पॅट्रॉन डॉ. मिलिंद कांबळे , उपाध्यक्ष डॉ. गिरीश डवले व डॉ. रवी चव्हाण, पी आर ओ डॉ. सचिन पाटील, सहसचिव डॉ. संजना लाल व डॉ. विशाल चव्हाण

मार्गदर्शन समिती:- डॉ. वसंत राशतवार ,डॉ. जे. ए. जीवानी,डॉ. बी एस झंवर,डॉ.संजय रत्नपारखी, डॉ. प्रभाकर काळमेघ, डॉ. विनायक कुलकर्णी डॉ. अनिल लोया डॉ. अजय कुसुंबीवाल डॉ. संजीव जोशी, डॉ. पी डी अग्रवाल, डॉ. सुनील भवरे डॉ.वीरेंद्र राठोड, डॉ.पी बी चव्हाण
कार्यकारी सदस्य म्हणून
डॉ. मीनल राशतवार, डॉ. सारंग तारक, डॉ.धीरज पांगुळ, डॉ.रवी पाटील, डॉ.अमोल खडसे,डॉ.सुबोध तिखे, डॉ. मुझम्मील कोशीश, डॉ. लीना मानकर, डॉ. स्वाती पाटील, डॉ. प्राची चक्करवार, डॉ. अमित व्यवहारे, डॉ. अभिजित गावंडे, डॉ.नाझीया काझी, डॉ. रुपाली साळवे, डॉ. सिद्धार्थ कुलकर्णी, डॉ. निशांत चव्हाण,
यांची निवड झाली तर
तालुका प्रतिनिधी म्हणून
दिग्रस-डॉ. व्यंकटेश देशपांडे,
पुसद- डॉ. संजय भांगडे
उमरखेड- डॉ. श्रीराम रावते
बाभूळगाव- डॉ. रवींद्र ठाकरे
नेर- डॉ. रणजित चव्हाण
आर्णी – डॉ. स्वप्नील सत्तूरवार
घाटंजी – डॉ. प्रफुल सिडाम
पांढरकवडा- डॉ. वैशाली सातुरवार
दारव्हा – डॉ. मनोज राठोड
वणी- डॉ जुमनाके
यांची निवड झाली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *