November 29, 2021

शरीर सुखाची मागणी करत पतीने केला पत्नीचा खून

Yavatmal – घाटंजी प्रतिनिधी:- घाटंजी तालुक्यातील पगडी येथे ठाकरे दांपत्य मध्ये नेहमीच शारीरिक सुखाच्या कारणावरून वाद व्हायचे,हा वाद विकोपाला जाऊन पतीने पत्नीच्या मानेवर व डोक्यावर कुर्‍हाडीने सपासप घालून पत्नीची हत्या केली आहे,

दिशा संतोष ठाकरे असं मृत महिलेचं नाव आहे,

 

पती संतोष ठाकरे हा नेहमीच पत्नी दिशाला शरीरसुखाच्या मागणीवरून वाद घालायचा, याच कारणावरून पती पती मध्ये वाद व्हायचे पतीने अनेक दिवसापासून राग मनात धरला होता,अशातच आज सकाळी अंदाजे 6 वाजता च्या दरम्यान पती संतोषने पुन्हा पत्नी दिशाला शरीर सुखाची मागणी करत वाद घातला, या वादात पती संतोष चा राग अनावर झाल्याने त्याने कुर्‍हाडीने दिशाच्या डोक्यात व मानेवर सपासप वार करुन पत्नी दिशा ठाकरेला जागीच ठार केले,

 

पोलिसांनी पंचनामा करून आरोपी संतोष गुरुदेव ठाकरे यांना गजाआड केले आहे, पुढील तपास घाटंजी पोलिस करीत आहे

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *