November 29, 2021

महावितरण व महापारेषण कंपनीधील कंत्राटी कामगारांना कमी करण्यात येवु नये तांत्रिक अॅप्रेंटीस कंत्राटी कामगार असोसिएशनची मागणी आजाद मैदान येथे धरणे आंदोलन सपन्न

 यवतमाळ प्रतिनिधी:-विद्युत सहायक भरती प्रक्रीया झाल्यानंतर महावितरण मधील कंत्राटी कामगारांना कामावरून कमी करण्यात येवु नये , महापारेषण कंपनीमध्ये स्टाप सेट अप च्या नावाखाली कमी केलेल्या कंत्राटी कामगारांना त्वरीत हजर करून घेण्यात यावे , कंत्राटी कामगारांना कायम करण्यात यावे त्यांना शास्वत रोजगारांची हमी देण्यात यावी कंत्राटी कामगारांना सरळ सेवा भरती मध्ये आरक्षण देण्यता यावे तसेच त्यांच्या सेवा काळानुसार त्यांना वयोमर्यादेमध्ये सुट देण्यात यावी , कंपनीमध्ये वायरमन आय.टी.आय. धारकांना संधी देण्यात यावी , सरळ सेवा भरती मध्ये राज्य शासनाने घोषीत केलेले आरक्षण त्वरीत देण्यात यावे , महावितरण जाहीरात क 5 / 2014 अन्वये निवड झालेल्या मराठा प्रवर्गातील उमेदवारांना त्वरीत हजर करून घेण्यात यावे , शासनाच्या नियमाप्रमाणे महावितरण कंपनीमध्ये वयोमर्यादा वाढविण्यात यावी यामागण्या करीता तांत्रिक अॅप्रेंटीस कंत्राटी कामगार असोसिएशन च्या वतीने आजाद मैदान मुंबई दि .8 आक्टोबर 2021 रोजी मोठया संख्येने शासन प्रशासनाप्रति आकाश व्यक्त करत राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात आले असल्याची माहीती राज्याध्यक्ष प्रभाकर लहाने यांनी प्रसिध्द केलेल्या पत्रकात दिली आहे . सदरहु आंदोलन विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचे केंद्रीय अध्यक्ष रविद्र बारई , उपाध्यक्ष गजानन नितीन पवार , बाळासाहेब सुपे , प्रविण पाटील , सरचिटणीस आर.टी.देवकांत साहेब , उपसरचिटणीस गायकवाड , उत्तम रोकडे , हरिराम गीते , संतोष घाडगे , किशोर फाले , रवि वैद्य , राम चव्हाण , शैलेश पेंडसे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले . यावेळी मार्गदर्शन करतांना राज्यध्यक्ष प्रभाकर लहाने यांनी कंत्राटी कामगार हा अनेक वर्षापासुन अहोरात्र राबत आहे . त्यांच्या मागण्या ज्वलंत असतांना शासन प्रशासन उदासिन असल्याचे निर्देशनास येते . राज्यातील कंत्राटी कामगारांचा आकोश पाहुन त्यांना न्याय मिळुन द्यावा त्यांचा अंत पाहु नये अन्यथा राज्याभर येत्या काळामध्ये परिणाम दिसुन येईल परिणामास प्रशासन जबाबदार राहील अशा स्वरूपाचा • ईशारा दिला . यावेळी राज्यउपाध्यक्ष नितीन चव्हाण , प्रशांत ननोरे , सरचिटणीस शेख राहील यांना कामगारांना मार्गदर्शन केले . आंदोलामध्ये अतुल पाटील थेर , विदर्भ कार्याध्यक्ष विक्की कावळे , कुणाल जिचकर , अनवेश देशमुख , प्रताप खंदारे , चंदु कागलकर , उध्दव गजभार , गणेश कोकोटे , अमोल इंगोले , प्रविण थोटे , धिरज यांच्या सह संपूर्ण महाराष्ट्रातुन बहुसंख्य कंत्राटी कामगार व शिकाऊ उमेदवार उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *