November 29, 2021

यवतमाळ अर्बन बँकच्या वतीने कोरोना लसीकरण

166 लोकांनी केले लसीकरण

प्रतिनिधी यवतमाळ:- यवतमाळ अर्बन बँकेच्या वतीने आज मुख्य शाखेत कोरूना लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध पक्षी तसेच तहसीलदार कुणाल झाल्टे यांनी बँकेत सुरू असलेल्या लसीकरण शिबिराला भेट दिली यावेळी 166 नागरिकांची लसीकरण करण्यात आले पैसे कमावणे हा बँकेचा मूळ उद्देश असला तरी सेवाकार्य मध्ये कुठे यवतमाळ अर्बन बँक मागे राहायला नको असे प्रतिपादन महाराष्ट्र लाईव्ह न्यूज शी बोलताना यवतमाळ अर्बन बँकेचे अध्यक्ष अजय मुंधडा यांनी केले आहे

कोरोना पासून बचाव करायचा असेल तर लसीकरण आवश्यव आहे. राज्यात तिस-या लाटेच्या अनुषंगाने पुन्हा डेल्टा प्लस या कोरोनाच्या नविन व्हेरीएंट चा धोका निर्माण झाला असल्यामुळे प्रत्तेक नागरीकांनी कोरोनाची लस घेण्याचे आवाहन यवतमाळ अर्बन बँकेचे अध्यक्ष अजय मुधडा यांनी नागरिकांना केले आहे

po

नागरीकांमध्ये जनजागृती करुन लसीकरण शिबिर यशस्वी केले. याठिकाणी 166 नागरीकांचे लसीकरण करण्यात आले.

  1. नागरिकांनी कुठल्याही अफवांना बळी न पडता आपले लसीकरण करुन घेण्याचे आवाहन यवतमाळ अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भगवान गुंटीमुकुलवार यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *