दवाखान्याला आग लाखोंचा मुद्देमाल जळून खाक, दिग्रसच्या सुभाष चंद्र बोस मार्केटमध्ये घटना.
दिग्रस(ता.प्र.)- शहरातील घंटीबाबा मंदिर मागील परिसरात शुभाष चंद्र बोस मार्केटमध्ये असलेल्या डॉ. यशवंत श्रीराम राऊत यांच्या दवाखान्याला रात्री ८:३० वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे
दवाखान्यातील फर्निचर वैद्यकीय सामग्री आणि इतर औषधी आगेत जळून खाक झाले. आग लागताच अग्रिशमन दलाला तात्काळ पाचरण करण्यात आले.
एकाच अग्रिशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली दरम्यान प्राणहानी झाली नसली तरी वित्त आणि आकडा मोठा असल्याचे सांगण्यात आले आहे. दिग्रस मधील घंटीबाबा मंदिर परिसर सतत गजबजलेला असतो याच चौकात डॉ. यशवंतश्रीराम राऊत यांचा दवाखाना आहे.रात्रीच्यावेळी अचानक आग लागल्याने एकच गोंधळ उडाला. दवाखान्यातील कर्मचाऱ्यांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न करीत असतानाच हा अधिकच धुमसत राहिली. मात्र काही वेळातच अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी पाण्याचा मारा करून ही आग अवध्या तासभरात आटोक्यात आणली आगेची धग इतकी मोठी होती की बाजूलाच असलेले न्यू सिद्धी मेडिकल देखील आगेने कवेत घेण्याचा प्रयत्न केला.सदर मेडिकल दुकान वैभव पद्मावार यांच्या मालकीचे असून त्यांची ही किरकोळ नुकसान आगीने झाले आहे. दरम्यान नगरपरिषद कर्मचारी आणि पोलीस यांनी आग विझविण्यासाठी परिश्रम घेतले.