सर्व शाखीय सोनार वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन
यवतमाळ स्थानिक सोनार सेवा महासंघ यवतमाळच्या वतीने सर्व शाखीय भव्य वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मेळावा हा येत्या 20 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 10 ते 5 या वेळात येथील संदीप मंगलम् ( संदीप टॉकीज) गेडाम नगर यवतमाळ येथे होणार असल्याचे आयोजकांनी कळविले आहे. या पूर्वी या मेळाव्याचे आयोजन 14 नोव्हेंबर रोजी करण्यात आले होते, परंतु कोरोना प्रादुर्भाव व शासनाच्या प्रतिबंधामुळे स्थगित करण्यात आला होता . परंतु हाच मेळावा श्री संत नरहरी महाराज पुण्यतिथी सोहळा शनिवार दिनांक 19 फेब्रुवारी 2022 चे औचित्य साधून दुसऱ्याच दिवशी म्हणजे रविवार 20 फेब्रुवारी 2022 रोजी आयोजित केला आहे. या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व शाखीय मुले-मुली यांची माहिती sonarsevamahasanghytl@gmail.com या ई-मेल वर पाठवावी. नोंदणी अर्ज भरणे आवश्यक असून आपणास मेलवर अर्ज देण्यात येईल, शिवाय या नोंदणी करिता यवतमाळ जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये नोंदणी सदस्य तसेच सोनार सेवा महासंघाचे महाराष्ट्रातील पदाधिकारी यांच्याकडे सुद्धा नोंदणी होईल. नोंदणी करता फॉर्म भरणे आवश्यक आहे. नोंदणी शुल्क एकशे एक्कावन रुपये राहणार आहे, वधू किंवा वर यांचे परिचय देतांना त्यांना स्वतः मंचावर हजर राहणे गरजेचे आहे, आपण फोन पे,गुगल पे, भीम ॲप याशिवाय पुढील बारकोड वर, किंवा 9637378378 या मोबाईल नंबर वर आपण नोंदणी शुल्क भरू शकता. फॉर्म भरून नोंदणी शुल्क भरल्यावरच आपली नोंदणी निश्चित समजली जाईल व त्यानंतर तशा सूचना आपणा पर्यंत पोहच केल्या जातील. एका लाभार्थ्या बरोबर 2 व्यक्तीना मोफत प्रवेश असेल, सदर मेळाव्यात मुला/मुलींनी सहभागी व्हावे असे आवाहन सोनार सेवा महासंघ यवतमाळच्या वतीने करण्यात आले आहे, असे अशोक बानोरे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सोनार सेवा महासंघ यवतमाळ यांनी कळविले आहे.