खड्डे बुजवण्याची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्याच्या निवासस्थानासमोरच मोठा खड्डा
जिल्ह्यातील नवीन रस्ते तसेच खड्डे बुजवण्याची जबाबदारी असलेल्या कार्यकारी अभियंता मुकडे यांच्या शासकीय निवासस्थानासमोरच मोठा खड्डा असल्याने विविध चर्चेला उधाण आले आहे
यवतमाळ:- शहरात ठिकठिकाणी मोठमोठाले खड्डे असून या खड्ड्यांमुळे अनेक अपघात झालेले आहेत मात्र प्रशासन सुस्त असल्याचं एकंदरीत दिसत आहे, अशातच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मुकडे यांच्या शासकीय निवासस्थान समोरच मोठा असल्याने या खड्ड्यात नेहमीच किरकोळ अपघात होत असतात याकडे प्रशासनाचे नियमित दुर्लक्ष होत आहे तर कार्यकारी अभियंता मुकडे यांच्या शासकीय निवासनासमोरच असलेल्या खड्ड्यात प्रशासन बुजू शकत नाही तर शहरातील तसेच जिल्ह्यातील इतर खड्डे कसे बुजेल अशी विविध चर्चा आता नागरिकांतून होत आहे