स्वामी विवेकानंद स्मारक भूमिपूजन संपन्न
स्वामी विवेकानंद स्मारक भूमिपूजन संपन्न
यवतमाळ – यवतमाळ येथील गोधणी, हायवेवर स्वामी विवेकानंद स्मारक भूमिपूजन संपन्न झाले. शारदीय नवरात्राच्या अष्टमीला मा. श्री. धनंजय तांबेकर एम.डी. गोदावरी अर्बन बँक, मा. डॉ. टी. सी. राठोड , मा. डॉ. मधुसुदन मारू, मा. सौ. रेणुताई शिंदे, मा. श्री. एल. एच. पवार यांच्या शुभहस्ते भूमीपूजन करण्यात आले.
सर्वप्रथम भगवान धन्वंतरी तसेच स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते हार अर्पन करण्यात आले. युगनायक स्वामी विवेकानंद यांचा भव्य व दिव्य स्मारक हे यवतमाळला होणार आहे. हे स्मारक यवतमाळ शहरात पहिल्यांदाच उभारणार आहे. हे फक्त स्मारकच रहाणार नसून एक प्रमुख आकर्षन केंद्र यवतमाळचे होईल व प्रत्येकांना येथून प्रेरणा मिळेल व सोबतच त्यांच्या विचारांचे चित्रप्रदर्शन, पुस्तक विक्री केंद्र असे राहणार आहे व यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन मा. श्री. धनंजय तांबेकर यांनी म्हटले तसेच या प्रसंगी डॉ. टी.सी. राठोड यांनी सुद्धा स्वामींजी हे युवकांचे प्रेरणास्थान आहे व खरोखरच यवतमाळकरांसाठी ही अत्यंत अभिमानाची बाब आहे.