घनकचऱ्याच्या प्रश्नासाठी हरित लवादकडे जाणार ऍड जयसिंग चव्हाण

यवतमाळ प्रतिनिधी :- यवतमाळ नगरपालिकेमध्ये गत तीन आठवड्यापासून घनकचऱ्याची कोंडी झाली असून नागरिक रस्त्यावर कचरा फेकून आपला संताप व्यक्त करीत आहे, त्यामुळे यवतमाळ शहरातील नागरिकांच्या आरोग्य आरोग्याचा प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे, प्रशासन व ठेकेदारानमध्ये वीसंवाद असल्याने त्याचा त्रास यवतमाळकर यांना सहन करावा लागत आहे
यवतमाळ नगर परिषद अंतर्गत घनकचरा व्यवस्थापनाचा बोजवारा असून शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत शहरात सध्या कुठेही घंटागाडी फिरत नसून शहरात कचऱ्याची समस्या गंभीर झाली आहे गेल्या तीन-चार दिवसांपूर्वी यवतमाळ नगरपरिषदे द्वारे सार्वजनिक ठिकाणी प्लास्टिक कचरा जाळण्यात आला जे पर्यावरणाला धोका पोहोचवणारे कृत्य आहे हे कृत्य पर्यावरण संरक्षण कायद्याचे सुद्धा उल्लंघन करणारे आहे त्यामुळे संबंधित व जबाबदार लोकांवर फौजदारी कारवाई करण्यात यावी असे यवतमाळकर जनतेच्या वतीने एड जयसिंग चव्हाण यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे
घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 नुसार कंत्राटदारांवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी पूर्णपणे यवतमाळ नगरपरिषदेची असून काम न करणाऱ्या कंत्राटदारावर यवतमाळ नगर परिषद कुठलीही कारवाई करताना दिसत नाही कंत्राटदार व यवतमाळ नगरपरिषद हे या कृत्यांमध्ये सहभागी असल्याचा आरोप सुद्धा यावेळी एडवोकेट जयसिंग चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला आहे
गेल्या काही दिवसांपासून यवतमाळ शहरातील हनुमान आकडा चौक,स्टेट बँक चौक, माळीपुरा फुल ,अभ्यंकर कन्या शाळे समोरील परिसर, दारवा रोड वरील सरकारी गोडाऊन इत्यादी ठिकाणी जमा झालेला कचरा व प्लास्टिक पन्नी सर्रासपणे जाण्यात येत आहे
त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे ही बाब अत्यंत गंभीर असून राष्ट्रीय हरित लवाद यांनी घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 अंतर्गत दिलेल्या नियमांचे उल्लंघन आहे या प्रकरणात महाराष्ट्र शासनाने घनकचरा व्यवस्थापन करण्याचे मान्य केल्याने सदर कृत्य हे नियमांचे उल्लंघन करणारे आहे तसेच पर्यावरण संरक्षण कायद्याचे उल्लंघन करणारे आहे यासाठी संबंधित व जबाबदार लोकांवर फौजदारी कारवाई करण्यात यावी व संबंधित संस्थांना का यादीत टाकुन देखरेख करण्यास जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी यवतमाळकर जनतेच्या वतीने एडवोकेट जयसिंग चव्हाण यांनी केली आहे पत्रकार परिषदेला नगरसेवक जावेद अंसारी नगरसेवक चंदू चौधरी जुल्फिकार अहमद, सय्यद सोहराब, श्याम बजाज किशोर भुते शुभम जांभूळकर मकसूद अली एडवोकेट बिपिन ठाकरे आदी उपस्थित होते