विदर्भात विद्युत प्रीपेड स्मार्ट मीटर लावू नये विदर्भ राज्य आंदोलन समितीची मुख्यमंत्र्यांना मागणी
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी द्वारे विदर्भात प्रीपेड स्मार्ट मीटर दिवाळीनंतर लावण्याकरिता ची कारवाई युद्ध पातळीवर सुरू आहे नागरिकांची मागणी नसताना तसेच गरज नसताना जनतेला विश्वासात न घेता विद्युत प्रीपेड स्मार्ट मीटर लावण्याची कारवाई महाराष्ट्र शासनाने सुरू केली असून ही प्रीपेड स्मार्ट मीटर योजना अन्यायकारक आहे तसेच नागरिकांसाठी डोकेदुखी आहे म्हणत विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना विदर्भात हे मीटर लावू नये यासाठी निवेदन देण्यात आले आहे
विदर्भात बऱ्याच लोकांकडे स्मार्टफोन नाही दुर्गम भागात तर स्मार्टफोन काय व रिचार्ज काय हे सुद्धा माहित नाही शहरातील झोपडपट्टी भागात रोज मजुरी करणारे नागरिक राहतात हातावर आणून पानावर खाणारे नागरिकांची समस्या जास्त आहे ग्रामीण व शहरी भागात सुद्धा मोबाईल नेटवर्कची समस्या आहे परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना अभ्यासाचा कोळंबा होऊन त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते रात्रीला केव्हाही रिचार्ज संपले तर आपोआप वीजपुरवठा खंडित होऊन लोकांना अंधारात राहावे लागेल लोड कमी जास्त झाल्याने तांत्रिक खराबीमुळे प्रीपेड स्मार्ट मीटर नादुरुस्त होऊ शकते अशातच हे गोरगरीब जनतेला परवडण्या सारखं नसल्याने विदर्भात वीज वितरणांना स्मार्ट प्रीपेड मीटर लावू नये अशी मागणी विदर्भ आंदोलन समितीच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे