सण उत्सवाच्या काळात नगरपरिषद यवतमाळ ने केली सफाई करण्यास सुरुवात
सण उत्सवाच्या काळात नगरपरिषद यवतमाळ ने केली सफाई करण्यास सुरुवात
यवतमाळ शहरात ठीक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचले असून नागरिकांचे आरोग्य सुद्धा धोक्यात आले आहे अशातच नगर परिषदेची घंटागाडी सुद्धा फिरत नसल्याने नागरिक हे रस्त्यावर कचरा टाकत आहे सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आता नगरपरिषद प्रशासन सज्ज झाले असून नगरपरिषद प्रशासनाने सफाई करण्यात सुरुवात केली आहे
यवतमाळ शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचले आहे शहरात सफाई कामगार फिरत नसल्याने शहरातील नागरिक हे रस्त्यावरच कचरा फेकताना आढळत आहे अशातच कचऱ्याच्या ढिगार्यातून अनेक परिसरात दुर्गंधी सुद्धा पसरली आहे शहरासह जिल्ह्यात डेंगू आजारांना थैमान घातला असून अनेक रुग्ण डेंगू आजाराने दगावले सुद्धा आहे अशातच नगरपरिषद प्रशासनाने सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर का होईना सफाई करण्यात सुरुवात केल्याने आता नागरिकांना दिलासा मिळणार आहे