अवैध रेती ट्रॅक्टरने वृध्दाला चिरडले
कळंब तालुक्यातील कोठा येथील ईसम शरदराव लक्ष्मणराव चौधरी (७५) यांना ८ नोव्हेंबरचे पहाटे ५ वाजता काही ईसमांसोबत मार्निंग वॉक साठी कोठा रोडने जाऊन परत येत होते. तेव्हा अवैध रेती वाहतूक करणाऱ्या अज्ञात ट्रॅक्टर चालकाने रस्त्याने चालत असलेल्या वृध्द इसमाला धडक देऊन पळून गेला.
नेहमीप्रमाणे दररोज सकाळी कोठा येथील नागरिक पहाटे कोठा रोडने मार्निंग वॉक साठी जात असतात अशाचप्रकारे ८ नोव्हेंबर रोजी पहाटे तीन – चार वृध्द नागरिक कोठा रोडने मार्निंग वॉक साठी गेले व सकाळी ५.३० ते ६.३० वाजताचे दरम्यान परत घराकडे येत असता कोठा गावाला लागून असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर भरधाव वेगात निष्काळजीपणे ट्रॅक्टर चालवून चालकाने पाठीमागून जबर धडक दिली पळून गेला. यामध्ये शरदराव लक्ष्मणराव चौधरी जागीच ठार झाले. तर ट्रॅक्टर चालक वाहन घेऊन पळून गेला सदर घटनेची तक्रार मृतकचा मुलगा विलास शरदराव चौधरी यांनी कळंब पोलीस स्टेशनला दिली. कळंब ग्रामीण रुग्णालयात आणून अज्ञात ट्रॅक्टर चालकावर कलम २७९, ३०४ अ भादवी सहकलम १३४ मो.वा.का. नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपाली भेंडे यांचे मार्गदर्शनाखाली करीत आहे.