“जान देंगे जमीन नही” पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समिती पुन्हा आक्रमक.
निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समिती पुन्हा आक्रमक
पाटबंधारे विभागाला जशास तसे उत्तर देणार
निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समिती विदर्भ मराठवाडा यांच्या वतीने कापेश्वर येथे कपिलेश्वर मंदिर परिसरात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीला नांदेड व यवतमाळ जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकरी शेतमजूर महिला भगिनी उपस्थित होत्या, सुपीक व समृद्ध जमीन,जंगल बुडून 95 गावातील दीड लाख लोकांना विस्थापित करून देशोधडी लवू पाहणाऱ्या निम्न पैनगंगा प्रकल्पाला गेल्या 27 वर्षापासून धरण विरोधी संघर्ष समिती तीव्र विरोध करीत आहे.
या प्रकल्पाच्या विरोधात ग्रिन ट्युबिनल कोर्ट पुणे व हायकोर्ट औरंगाबाद येथे न्यायालयात याचिका दाखल असतानाही
पाटबंधारे विभाग व भूमी अभिलेख कार्यालयाने शेतीचे सर्वे व घराच्या मोजणीचे काम हाती घेतल्याने त्याविरोधात आजच्या बैठकीत परिणामाला सामोरे जावे लागेल असा धरण विरोधी समितीने खणखणीत इशारा यावेळी दिला.
निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील वातावरण अतिशय शांत प्रिय असून काही अधिकाऱ्यांच्या अठाहासापाई व हेकेखोर पणामुळे बुडीत क्षेत्रातील काही गावांतील वातावरण स्फोटक होत असल्याचा आरोप सुद्धा धरण विरोधी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केला.
“जान देंगे जमीन नही”
हा नारा देत पुन्हा निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीने पैनगंगा प्रकल्पा विरोधात आपले आंदोलन तीव्र करण्याचा या बैठकीच्या निमित्ताने शासनाला इशारा दिला.
पाटबंधारे विभागांने प्रकल्पाचे काम सुरू करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना जशास तसे उत्तर देऊ असा इशारा धरण विरोधी संघर्ष समितीने यावेळी दिला.
पाटबंधारे विभागाच्या आततायी पणामुळे निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि याला सर्वस्वी पाटबंधारे विभागाच जबाबदार राहील असेही यावेळी अनेक वक्त्यांनी आपल्या भाषणातून स्पष्ट केले,
यावेळी समितीचे अध्यक्ष प्रल्हादराव पाटील जगताप, यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मुबारक तंवर, विजय पाटील राऊत, एडवोकेट बालाजी येरावार , प्रल्हादराव गावंडे सर, बाबूभाई फारुकी, बंडूसिंग नाईक, कॉम्रेड अर्जुन आडे, जितेंद्र मोघे, मनोज कीर्तने, रितेश परचाके , डॉ. सुप्रिया गावंडे , डॉ.प्रदीप राऊत, शंकर सिडाम, यांनी आपल्या भाषणातून धरण विरोधी संघर्ष समितीची भविष्यातील आंदोलनाची दिशा स्पष्ट केली.
श्री.प्रकाश राठोड, डॉ.बाबाराव डाखोरे, बंटी पाटील जोमदे, जयराम मिश्रा, भगवतीप्रसाद तितरे, निलेश कुमरे, गजानन डाखोरे,आकाश वाघमारे,विजय समगिर, मंगेश सोयाम, मारोती ठाकरे, अविनाश नेमाडे, गुलाब मेश्राम, बालाजी ठाकरे, महेंद्र जैस्वाल, विजय पाझारे,राज गावंडे, उत्तम कांबळे, उत्तम मिरासे, राजु राउत, कैलास उकले, सुरेश महल्ले व बुडीत क्षेत्रातील अनेक सरपंच, उपसरपंचासह, शेतकरी व शेतमजूर,युवक व महिला भगिनी मोठ्या संख्येने
या बैठकीला उपस्थित होते.
या बैठकीला सावळी सदोबा पोलीस चौकीचे ठाणेदार संदिप बारिंगे व त्यांच्या पोलिस सहकाऱ्यांनी यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.