भक्ती शक्तीच्या उत्सवात विद्युत रोषणाईने सजले शहर.
भक्ती शक्तीच्या उत्सवात विद्युत रोषणाईने सजले शहर.
ढोल-ताशांचा गजर, भगव्या टोप्या घालून भगवे झेंडे फडकावत आई जगदंबेचा घोष करणाऱ्या कार्यकर्त्यांनी ओसंडून वाहणाऱ्या उत्साहात मिरवणुका काढून आदिमाया आदिशक्ती देवी भगवती आई जगदंबेच्या उत्सवमूर्तीची प्रतिष्ठापना केली. घरोघरी घटस्थापनेने नवरात्रोत्सवास गुरुवार पासून उत्साहात प्रारंभ झाला.
नऊ दिवस भक्ती आणि शक्तीच्या पूजेबरोबरच संगतीच्या तालावर रासगरबा आणि दांडियाच्या खेळात तरुणाईचा उत्साह ओसंडून वाहत राहणार आहे.
या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण शहर सजले असून शहरातील एकही भाग असा नाही जिथे विद्युत रोषणाई करण्यात आली नसेल दुर्गा उत्सव निमित्ताने केलेली विद्युत रोषणाई डोळ्यांचे पारणे फिटेल असेच आहे. त्याच बरोबर रात्री उशिरापर्यंत शहरात दुर्गा मातेच्या दर्शनासाठी नागरिक बाहेर पडत असल्याचे पहायला मिळत आहे.