राजस्थानी मल्टिस्टेटच्या ठेवीदारांची पावणेपाच कोटीने फसवणूक
राजस्थानी मल्टिस्टेटच्या ठेवीदारांची पावणेपाच कोटीने फसवणूक
पोलिसात अध्यक्षांसह संचालक मंडळावर गुन्हे
उमरखेड- जादा व्याजदराचे आमिष दाखवून अनेक नागरिकांना त्यांच्या ठेवी भरण्याचा राजस्थानी मल्टिस्टेट को- ऑपरेटिव्ह सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी केला. मात्र कालावधी पूर्ण झाल्यानंतरही ठेवीदारांचा पैसा देण्यास टाळाटाळ केली. या संदर्भात पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतरही बरेच दिवस उलटले. पोलिसांनी चार कोटी ४७ लाख ७४ हजार ३४८ रुपयांच्या फसवणूक प्रकरणी संस्थेच्या अध्यक्षांसह संचालक मंडळ व सीईओ,व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल केले.
गणेश लक्ष्मण शिंदे (५४) रा. झाकीर हुसेन वार्ड, उमरखेड असे फिर्यादीचे नाव आहे. तर चंदूलाल मोहनलाल बियाणी असे राजस्थानी मल्टिस्टेट संस्थेच्या अध्यक्षांचे नाव आहे. बियाणी यांचेसह उपाध्यक्ष बालचंद्र लोढा, सचिव बद्रिनारायण बाहेती, सहसचिव प्रल्हाद अग्रवाल, कोषाध्यक्ष विजय लड्डा, संचालक अशोक जाजू, सतिश सारडा, कल्पना बियाणी, नामदेव रोडे, जगदीश बियाणी, सीईओ व्यंकटेश कुलकर्णी, व्यवस्थापक विजय खंदारे, कॅशिअर भक्ती डागा अशी गुन्हे दाखल झालेल्यांची नावे आहेत. गणेश शिंदे यांच्या तक्रारीनुसार मे २०२३ मध्ये संस्थेचे शाखाअधिकारी विजय खंदारे व कर्मचारी हे शिंदे यांच्या ढाणकी रोडवरील श्रीराम वर्कशॉपमध्ये आले. पैसे भरल्यावर ८५ टक्क्यांपर्यंत कर्ज देण्याचे वचन दिले. त्यामुळे शिंदे यांनी २५ लाख १७ हजार १९५ रुपयांची उमरखेड शाखेत एफडी केली. मात्र ही एफडी मॅच्युअर झाल्यावर शिंदे शाखेत गेले असता त्यांनी ब्रांच ऑफिसमधून पैसे देऊ शकत नाही, तुम्ही सेव्हिंग खात्यात पैसे ट्रान्सफर करा, असे म्हणत पैसे कधीही काढता येतील असे व्यवस्थापकाने सांगितले.
पोलिसांनी भादंविच्या ४२०,
४०९, ४०६ सहकलम ३ व महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्था हितसंबंधाचे संरक्षण अधिनियमांन्वये गुन्हे नोंद केले.