September 17, 2025

भाईगिरीशी माझा संबंध नसल्याची स्पष्टोक्ती आ. मदन येरावार

भाईगिरीशी माझा संबंध नसल्याची स्पष्टोक्ती.

राजकीय सोयीतून आरोप करणाऱ्यांचे व्हिजन काय.?

यवतमाळ:-  मी चारवेळा आमदार झालो. त्यात २०१४ पासून सलग आमदार आहे. राज्यमंत्री म्हणूनही काम केले. या कालावधीत विरोधकांवर वैयक्तीक आरोप कधीच केले नाही. केवळ विचार व विकासाचे राजकारण करतो. मात्र विरोधक राजकीय सोयीतून विविध आरोप करीत आहे. या विरोधकांचे व्हिजन काय आहे, असा सवाल महायुतीचे उमेदवार आ. मदन येरावार यांनी केला.दारव्हा मार्गावरील एका हॉटेलमध्ये आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष शंतनू शेटे उपस्थित होते.

विधानसभेची निवडणूक सहा वेळा लढविली. परंतु, गुन्हेगारी, भाईगिरी हा मुद्दा प्रथमच पाहत आहे. भाईगिरीशी माझा कुठलाही संबंध नाही, या संबंधी विविध दाखले देत आ. येरावार यांनी विरोधकांवर पलटवार केला. विधीमंडळात विरोधी पक्ष नेत्यांनी उपस्थित केलेल्या भाईगिरीच्या प्रश्नावर त्यांना विस्तृत माहिती दिली होती. घरदांज कुटुंबात जन्माला आलो तर ही माझी चूक आहे का, असा सवालही त्यांनी केला. उद्योग व्यवसायातूनही मला यश मिळाले. मी कधीच कुण्या अधिकाऱ्याला पैसे, कमिशन, हप्ता मागितला नसल्याचेही सांगितले. महादेव मंदिराचे अध्यक्षपद केवळ
सर्वांच्या आग्रहामुळे घेतले. जमिनीसंबंधी लावण्यात येत असलेले आरोप चुकीचे असल्याचे आ. येरावार यांनी स्पष्ट केले. शहरासह मतदारसंघात विविध विकासकामे आणली. अडीच वर्षांत जेवढा निधी आणला तो, आजपर्यंतही कधी आला नव्हता, असा दावाही आ. येरावार यांनी केला. मात्र विरोधक विकासावर न बोलता केवळ सोयीचे राजकारण करीत आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपा संविधान बदलविणार आहे, असा अपप्रचार काँग्रेसने केला. विधानसभेतही हाच मुद्दा मांडला जात आहे. प्रत्यक्षात मात्र काँग्रेसकडूनच संविधानाची मोडतोड झाली असल्याचा आरोप आ. मदन येरावार यांनी केला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed