September 18, 2025

गांधी चौकात झाली काँग्रेसची विजय निर्धार सभा.

गांधी चौकात झाली काँग्रेसची विजय निर्धार सभा

यवतमाळ :-  प्रभाजपच्या राजवटीला यवतमाळ विधानसभा क्षेत्रातील मतदार शेतकरी व कष्टकरी त्रासले असून, त्यांनी जेथे जेथे काँग्रेसची सभा होते तिथे काँग्रेसलाच आम्ही मतदान करू असे सांगत काँग्रेस उमेदवार बाळासाहेब मांगुळकर यांच्या विजयाचा निर्धार खुल्या दिलाने व्यक्त केलाय! हा एक अर्थाने जनतेचा काँग्रेसच्या प्रती व्यक्त केलेला खूप मोठा विश्वासच आहे! असे उद्‌गार बाळासाहेब मांगूलकर यांनी गांधी चौकात झालेल्या भव्य प्रचार सभेत व्यक्त केले.
ह्या विजय निर्धार सभेच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार काँग्रेस नेते कीर्ती बाबू गांधी उपस्थित होते. विठ्ठल मंदिरा समोर झालेल्या ह्या सभेत, बाळासाहेब चौधरी यांनी यवतमाळचे धनाढ्य आमदार हे प्रत्येक व्यक्तीचे मोल माप फक्त स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी करतात,असा आरोप केला. संतोष ढवळे यांनी महायुतीचा आमदार जनतेच्या हिताचे विकास कार्य करीत नाही, त्यांना फक्त स्वतःच्या स्वार्था पलीकडे काहीच दिसत नाही,असे म्हणाले.

सभेत निर्भय चळवळीच्या ॲड. सीमा लोखंडे यांनी गुंडशाहीचा खरपूस समाचार घेतला.

सभेत संतोष बोरले, शिवसेनेचे नागरगोजे,अशोक मुराब आदि नेते उपस्थित होते.ही विजय निर्धार सभा गुरूदेव सेवा गणेश मंडळ,गणेश व्यायाम शाळा, आझाद दुर्गोत्सव मंडलाच्या कार्यकर्त्यांनी आयोजित केली होती. सर्वश्री किशोर पाटील, रामेश्वर बिजुळकर,शंकर चव्हाण,राजू ठाकरे, राजू चिंधे, प्रदीप काळे, आरीफभाई खान, श्रावण चित्तारलेवार,कमलेश यादव यांनी ही सभा आयोजित करण्यास परिश्रम घेतले.

मांगुळकरांच्या आरोपामुळे धनाढ्य आमदार हैराण!

यवतमाळचे भाजप आमदार मदन येरावार यांनी मांगुळकर यांच्या प्रश्नाला उत्तरे देण्यासाठी पत्रपरिषद आयोजित केली, परंतु पत्रकारांना ते उचित असे उत्तर देऊ शकले नाहीत.अमृतच्या प्रश्नावर बोलतांना त्यांनी ,शहरात अजून एक पाईपलाईन टाकायची आहे असे सांगितले,आणि अमृतचे उद्‌घाटन का घाईत केले यावर त्यांनी मौन बाळगले. काँग्रेस उमेदवारांच्या बद्दल कुठलाही मुद्दा त्यांना स्पष्ट मांडता आला नाही. माझ्याकडे कुठलीही गुंड व्यक्ती सोबतीला नाही असे म्हणत त्यांनी भूतकाळात चौधरी व मांगुळकर हे कोण होते.? असे उत्तर दिले. 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed