उमरखेडमध्ये 249 दिव्यांग व जेष्ठांनी घरीच केले मतदान.

 

उमरखेडमध्ये 249 दिव्यांग व जेष्ठांनी घरीच केले मतदान.

 

उमरखेड:- वय वर्ष 85 व दिव्यांग मतदारांचे मतदानाचे प्रमाण वाढावे तसेच या मतदारांना घरीच मतदानाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी आयोगाच्या निर्देशाप्रमाणे अशा मतदारांचे घरीच मतदान घेतले जात आहे. उमरखेड विधानसभा मतदारसंघात 249 मतदारांच्या घरी जावून पथकाच्यावतीने त्यांचे मतदान घेण्यात आले.

 

निवडणूक आयोगाच्या निर्देशनुसार 85 वर्षावरील वयोवृद्ध व दिव्यांग नागरिकांच्या घरी जाऊन मतदान घेण्यासाठी सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार उमरखेड विधानसभा मतदारसंघात २६८ नागरिकांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे 12 अ फॉर्म भरून घरीच मतदानाची मागणी केली होती. त्यानुसार उमरखेड निवडणूक निर्णय अधिकारी सखाराम मुळे यांच्या नेतृत्वात निवडणूक अधिकारी व कर्मचारी यांनी घरोघरी जाऊन 85 वर्षावरील वयोवृद्ध व दिव्यांग नागरिकांचे मतदान घेण्यासाठी ८ नोव्हेंबर पासून विशेष मोहिम राबविण्यात आली होती.

या दरम्यान 224 वयोवृद्ध नागरिकांनी घरी मतदान केले तर 25 दिव्यांगांनी देखील घरूनच आपल्या मतदानाचा अधिकार बजावला. उमरखेड शहरातील सदानंद वार्डातील 91 वर्षीय शशिकांत आडे यांचे मतदान घेण्यासाठी अधिकारी रविंद्र चव्हाण, दिलीप सिर्लावर, विश्वंभर कदम, पोलीस कॉन्स्टेबल रवि चव्हाण, विजय खानझोडे, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आशिष राठोड हे उपस्थित होते. यांच्यासह दिव्यांग व वयोवृध्दांना कमी त्रासात घरीच मतदान करता येत असल्याने त्यांच्याकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed