गांजा विकणाऱ्या महिलेला अटक, आर्णी पोलिसांची कार्यवाही.
गांजा विकणाऱ्या महिलेला अटक, आर्णी पोलिसांची कार्यवाही.
संपूर्ण जिल्ह्यात गांजा तस्करीचे मायाजाळ मोठ्या प्रमाणात निर्माण झाले आहे. अनेक तरुण गांजाच्या चक्रव्यूहात अडकत आहे. प्रशासनाच्या उपाययोजना फोल ठरत आहे. अशातच पोलिसांनी एका महिलेला गांजा विकतांना बेड्या ठोकल्या आहे. ही कारवाई पारधी बेडा येथे दिनांक १२ नोव्हेंबर रोजी करण्यात आली. करुणा साहेबराव राठोड वय ४५ वर्ष असे गांजा तस्करीत पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या महिलेचे नाव आहे.
आर्णी पोलिसांना गाज्या खेप उतरली असुन सदर महिला ही दर दवशी चिल्लर विक्री करत आहे अशी गोपीनीय माहीती मिळाली या माहितीच्या आधारे आर्णी पोलिसांनी पारधी बेड्यावर धाड टाकून कायद्यातंर्गत सदर गांज्याची तपासणी करुन सदर आरोपी गांज्या तस्करी करणारी महीला करुणा साहेबराव राठोड वय ४५ वर्ष हिला ७ किलो ३०० ग्रॅम गाज्यासह अटक करण्यात आली. सदर कार्यवाही जिल्हा पोलिस अधिक्षक कुमार चिंता यांच्या आदेशान्वये अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक केशव ठाकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत देशमुख, नापोशी नफीज शेख, ऋषी इंगळे, नितीन वास्टर, अतुल तागडे बीट जमादार मुकुंद केंद्रे यांनी ही कारवाई केली.