तरुणाच्या गळ्यातील सोन्याचा गोप हिसकवणारे अट्टल २ चोरटे अटकेत
तरुणाच्या गळ्यातील सोन्याचा गोप हिसकवणारे अट्टल २ चोरटे अटकेत.
लाडखेड पोलिसांची कारवाई.
तिवसा येथे लुटमारीची घटना.
दारव्हा – बसस्थानकावर उभ्या असलेल्या एका तरुणाच्या गळ्यातील दीड लाखाचा सोन्याचा गोप लंपास करणाऱ्या दोघांना लाडखेड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई सोमवारी दि. १८ नोव्हेंबर रोजी करण्यात आली असून हा लुटमारीचा प्रकार तिवसा बसस्थानक परिसरात शनिवारी रात्री घडला होता. मिलिंद वसराम राठोड (वय ४०) वर्ष आणि अविनाश उर्फ चोटी चरणदास चव्हाण (वय २४) वर्ष दोन्ही रा. तिवसा जि. यवतमाळ अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
या प्रकरणी पालिस सुत्रांकडून मिळालेला माहितीनूसार, प्रथमेश मुकुंदराव अबनावे (वय २५) वर्ष रा. यवतमाळ यांनी लाडखेड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीनुसार, लाडखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या तिवसा बसस्थानक परिसरात प्रथमेश शनिवारी रात्री उभा होता. अश्यात अनोळखी दोघांनी त्याच्या गळ्यातील २२.४१ ग्रॅम वजनाचा दीड लाखाचा सोन्याचा गोप हिसकावून पळ काढला. ही कारवाई पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली लाडखेड ठाणेदार विशाल हिवरकर, पथकातील पोलिस अंमलदार शालीक लडके, उमेश शर्मा यांनी पार पाडली.
कर्मचाऱ्यांनी सापळा रचून पार पाडली कारवाई.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला. अश्यात ते दोघेही चोरटे तिवसा येथील असल्याची गोपनीय माहिती लाडखेड पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सापळा रचून त्या दोघांना सोमवारी ताब्यात घेतले. दरम्यान त्या दोघांकडून गुन्ह्यातील दीड लाखाचा सोन्याचा गोप जप्त करण्यात आला.