मतदान केंद्रांवर पोलीसांचा चोख बंदोबस्त – कुमार चिंता जिल्हा पोलीस अधीक्षक.
मतदान केंद्रांवर पोलीसांचा चोख बंदोबस्त- कुमार चिंता जिल्हा पोलीस अधीक्षक यांची पत्रकार परिषदेत माहिती.
यवतमाळ – विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्यासाठी यवतमाळ पोलिस सज्ज झाले असल्याची माहीती जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या संयुक्त पत्रकार परीषेदत माहीती दिली. मतदान प्रक्रिया शांततेत आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी साडेतीन हजार पोलिसांचा फौजफाटा राहणार आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत, सुरळीत आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. जिल्ह्यात सात मतदारसंघ असुन त्यामध्ये २० निवडणूक बुथ हे संवेदनशील आहेत. त्यामुळे या मतदान केंद्रांवर तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.सर्वच पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील मतदान केंद्रांच्या सुरक्षेबाबतचा आढावा जिल्हा पोलिस अधिक्षक कुमार चिंता यांनी घेतला असुन बुथवर तसेच बुथबाहेर सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्याबाबत त्यांनी सूचना केल्या आहेत. तसेच यवतमाळ हद्दीतील मतदान केंद्रांना भेट देऊन तेथील सुरक्षेचा तसेच मतदान प्रक्रिया शांतते व भयमुक्त वातावरणात होत आहे किंवा कसे याबाबत वरिष्ठ पोलिस अधिकारी पाहणी करणार आहेत. त्यांच्या सोबत स्ट्रयकिंग फोर्स राहणार आहे. गुन्हे शाखेची पथके मतदान केंद्र परिसरात गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. तसेच गुन्हे शाखेकडून विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. साध्या वेशातील पोलिस देखील ‘वॉच’ ठेवणार आहेत. मतदान यंत्रांसाठी पथके मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर मतदान केंद्रामधून मतमोजणी केंद्रापर्यंत मतदान यंत्रे सुरक्षित पोहचणे आवश्यक आहे. त्यासाठी देखील पोलिसांची विशेष पथके सज्ज करण्यात आली आहेत.