“सिंदूर” सन्मान तिरंगा यात्रा
भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा देत तिरंगा रॅली.
सिंदूर सन्मान तिरंगा यात्रा भावे मंगल कार्यालय येथून सुरुवात झाली. यात्रेचा समारोप तिरंगा चौक येथे करण्यात आला.
यामध्ये 35 माजी सैनिकांचा सत्कार शाल व श्रीफळ देऊन करण्यात आला व शहीद कुटुंबीय यांचा सत्कार करण्यात आला.. यामध्ये जे जवान सध्या ऑपरेशन सिंदूर मध्ये कार्यरत आहे अशा काही कुटुंबीयांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.
भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा देत तिरंगा रॅली काढण्यात आली.
देशभक्त यवतमाळ करांच्या वतीने काढण्यात आलेल्या या रॅलीमध्ये आदिवासी विकास मंत्री अशोकराव उईके, माजी मंत्री मदन येरावार,आमदार राजू तोडसाम,माजी आमदार संजू रेड्डी बोदकूरवार, माजी आमदार संदीप धुर्वे प्रफुल चव्हाण,राजू पडगिलवार,
कीर्ती राऊत, अजय मुधडा, सुरेश राठी, डॉ. सुरेंद्र पद्मावार व इतर शहरातील गणमान्य नागरिक उपस्थित होते या कार्यक्रमाचे संचालन या तिरंगा यात्रेचे संयोजक राजू पडगिलवार यांनी केले.