यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्याची मान्सूनपूर्व तयारी जोरात.
शेतकरी मशागतीत व्यस्त.
यवतमाळ जिल्ह्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व तयारीला वेग आला असून, शेतकरी वर्ग शेती कामात व्यस्त आहे. पारंपरिक बैलजोडीच्या साहाय्याने नांगरणी, शेत सपाट करणे अशी विविध कामे सुरू आहेत. मान्सून काही दिवसांवर येऊन ठेपल्याने योग्य वेळेत पेरणी करता यावी यासाठी शेतकरी आवश्यक ती पूर्वतयारी करत आहेत.