वीज पडून शेतकरी महिला ठार

महागाव:- गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत असून विजेचा कडकडाट होत आहे पिंपळगाव येथील शेतकरी महिला आपल्या शेतात साफसफाईचे काम करीत असताना अचानक आलेल्या आलेल्या पावसात विजेचा कडकडाट झाला आणि अंगावर वीज पडून महिला ठार झाली. ही घटना सोमवारी (ता. १९) चार वाजता पिंपळगाव शिवारात घडली आहे

विमल किसन भीसे वय ३५ वर्षे असे मृतक महिलेचे नाव आहे. अवकाळी पाऊस तालुक्यात हजेरी लावत असून पिकाचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे नुकताच विज पडून मुख्याध्यापकाचा मृत्यू झाला होता. पिंपळगाव येथील शेतकरी महिला विमल आपल्या शेतातील काडी कचरा व साफसफाई करण्यासाठी गेली असता दुपारी चार वाजताच्या दरम्यान आलेल्या अचानक पावसासह विजेचा कडकडाट झाला त्यातच महिलेच्या अंगावर वीज पडल्याने विमल जागीच ठार झाली आहे. अचानक वीज पडण्याचे प्रमाण वाढले असून शेतात जाणाऱ्या महिला भीतीचे वातावरण पसरले आहे या घटनेची माहिती मिळताच तहसीलचे महसूल अधिकारी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला .महिलेच्या अचानक मृत्यूमुळे पिंपळगाव परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed