आदिवासी समाजाच्या प्रश्नांवर राज्यपालांशी सविस्तर चर्चा.

आदिवासी समाजाच्या प्रश्नांवर राज्यपालांशी सविस्तर चर्चा.

लोकभवन, मुंबई येथे राज्याचे नवनियुक्त राज्यपाल मा. जिष्णु देव वर्मा यांची सर्वपक्षीय आदिवासी आमदारांच्या शिष्टमंडळासह सदिच्छा भेट घेण्यात आली.

या भेटीदरम्यान राज्यातील आदिवासी समाजाच्या प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः
जनजाती सल्लागार परिषदेची बैठक नियमित घेणे
शासकीय सेवांमधील रिक्त पदे तातडीने भरणे
पेसा (PESA) कायद्याची प्रभावी अंमलबजावणी
यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांकडे राज्यपाल महोदयांचे लक्ष वेधण्यात आले.

राज्यपाल महोदयांनीही आपण आदिवासी समाजातून असल्याने आदिवासी बांधवांच्या समस्या समजून घेऊन त्यांच्या निराकरणासाठी संबंधितांशी चर्चा करू तसेच आदिवासी क्षेत्रांना भेट देऊ, असे आश्वासन दिले.

यावेळी मंत्री श्री. नरहरी झिरवळ, आमदार प्रा. श्री. राजूभाऊ तोडसाम तसेच राज्यातील सर्व आदिवासी आमदार उपस्थित होते. तसेच राज्यपाल महोदयांचा सत्कार करून त्यांना भगवान बिरसा मुंडा यांची प्रतिमा भेट देण्यात आली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *