_खरं तर आज गरज आहे सर्व नगरसेवक नगरसेविका सत्ताधारी असो कि विरोधक यांनी आपले पद त्याग करण्याची….

 

प्रतिनिधी यवतमाळ:- यवतमाळ शहरातील घनकचरा व्यवस्थापनाच्या गंभीर समस्येवर अनेक नाट्य रंगले.कधी एकमेकांनी एकमेकांवर चिखल फेक केली तर कधी एकमेकांच्या गळ्यात गळे घालून आंदोलनने केली निवेदने दिली.
मात्र यात भरडल्या गेली ती यवतमाळची जनता गेल्या अनेक महिन्यापासून शहरातील कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असतांना प्रशासन व नगरसेवक नगरसेविका यवतमाळकरांचा अंत पाहत आहे.
विशेष म्हणजे केद्रांत सत्ता असलेले नगर परिषदेचे सत्ताधारी व राज्यात सत्ता असलेले नगरपरिषदेचे विरोधी पक्ष म्हणून यांच्या शब्दाला मान असणे आवश्यक आहे. एकीकडे प्रशासन सुध्दा यांना जुमानत नाही तर दुसरीकडे यांचे गाॅडफादर असलेले नेते यांना विचार नाही.त्यामुळे यवतमाळ नगरपरिषदेचा कारभार व कर्मचारी यांना जुमानत नाही.काही महिन्यांपूर्वी एका नेत्याच्या पत्रावरुन  जिल्हाधिकारी यांची बदली होऊ शकते पण यवतमाळ शहरातील रेंगाळलेल्या कचऱ्याच्या समस्येवर एकमेकांवर कुरघोडी करण्यातच लोकप्रतिनिधी धन्यता मानत आहे.त्यामुळे यवतमाळ शहरातील लोकप्रतिनिधी यवतमाळकरांच्या समस्या सोडवण्यास फोल ठरल्यामुळे यवतमाळकरांच्या सहनशीलतेचा अंत पाहु नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed