October 6, 2022

खा. भावनाताई गवळी यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा  

रक्तदान शिबीर, शिलाई मशिन्स तसेच सॅनिटायजर चे केले वाटप

 

प्रतिनिधी यवतमाळ

 

कोरोना संकटामुळे वाढदिवसाला हारतुरे तसेच पोस्टर्स वर खर्च न करता सामाजिक उपक्रम राबविण्याच्या सुचना भावनाताई गवळी यांनी दिल्या होत्या. त्या अनुषंगाने शिवसैनिकांनी खासदार भावनाताई गवळी यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला.  

खासदार भावनाताई गवळी यांच्या वाढदिवसानिमित्त संदीप मंगलम येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबीराची सुरुवात यवतमाळ विधानसभा संपर्कप्रमुख संतोष ढवळे यांच्या उपस्थितीत करण्यात आली.  या रक्तदान शिबिरात शिवसैनिकांनी 70 बाटली रक्तदान केले. वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्याच्या सूचना खासदार भावनाताई गवळी यांनी दिल्यानंतर नगरसेवक तथा शहर प्रमुख पिंटू बांगर यांनी श्री संतोष ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाभूळगाव वसंत जाधव, उपतालुकाप्रमुख दारव्हा गुणवंत ठोकळ, राजू नागरगोजे, संजय कोल्हे, सुनील डीवरे, कृष्णाजी ईरवे, विकास शेळके, युवा सेना जिल्हाप्रमुख डॉक्टर प्रसन्न रंगारी, युवा सेना शहर प्रमुख भूषण काटकर, युवासेना तालुका प्रमुख पवन शेन्दरे,  गणेश गावंडे एस टी कामगार सेना यवतमाळ, विजू राठोड, संतोष गदई, नीलेश लड़के, आशीष ढोले,  आकाश गायकी, बाळासाहेब वळसकर, ,बाळासाहेब जयसिंगपुरे, कार्तिक लांजेवार, अनिकेत थोरात, विनोद राऊत , रवि बनकर, उदय कुलकर्णी, बालू  दराडे, विशाल बरोरे, आकाश जाधवर, निखिल डगवार, दीपक जयस्वाल, सोमेश्वर उगे, अभिजीत पवार, संकेत उन्हाले, ऋषी इलमे आदींनी परिश्रम घेतले. याठिकाणी सर्व रक्तदान करणा-या रक्तदात्यांचा सन्मान करण्यात आला. याशिवाय शिवसेनेचे यवतमाळ विधानसभा संपर्क प्रमुख संतोष ढवळे यांच्या कडून  वसंतराव नाईक शासकीय  रुग्णालयाला 1500 लीटर सेनिटाइजर  दोन पल्स ऑक्सीमीटर च्या मशिन्स भेट देण्यात आल्या.  या प्रसंगी डॉ. मिलिंद कांबळे

अधिष्ठाता वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालय  रुग्णालय यवतमाळ, डॉ बाबा येलकेरविंद्र राठोडगणेश बयासनितिन बांगर शिवसेना शहर प्रमुख तथा नगरसेवक, मंदाताई गाडेकर शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख, दिनेश इंगळे संचालक जय महाराष्ट्र रुग्नवाहिका, पवन शेन्दरे युवासेना तालुका प्रमुख यवतमाळ, राजू नागरगोजे, नंदुभाऊ मोरेप्रसन्ना रंगारीअतुल गुल्हाने , संजय कोल्हे आदि उपस्थित होते. भावना ताई गवळी यांच्या वाढदिवसानिमित्त वृध्दाश्रमात जावून तिथल्या वृध्दांची आस्थेने विचारपूस करण्यात आली. या वृध्दांना फळ व  बिस्कीटचे वाटप करण्यात आले.  सौ प्रतिभाताई राने व सौ पुष्पलता ताई गीरोलकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शिवसेनेचे पदाधिकारी गिरीश व्यास तसेच दिपक सुकळकर यांनी सुध्दा जिल्हा वाहतुक शाखा, यवतमाळ, शहर पोलीस स्टेशन, जिल्हा कारागृह, पोलीस स्टेशन, वडगांव येथे जाऊन 300 सॅनिटायझर बॉटल्सचे वाटप केले. दिग्रस येथील  कोविड सेन्टर मध्ये ड्रायफ्रुट चे वाटप दीपक फिस्के तर्फे करण्यात आले. याशिवाय बाभूळगाव येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. या शिबीराला सुध्दा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.

 

शिलाई मशिन्स चे वाटप

 

खा. भावनाताई गवळी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शहरातील अनेक गरजू महिलांना शिवसेनेच्या वतीने शिलाई मशिन्सचे वाटप करण्यात आले. सध्या कोरोना संकटामुळे अनेक कुटूंबावर बेरोजगारीचे संकट उभे झाले आहे. त्यामुळे महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने या शिलाई मशिन्सचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी शिवसेनेचे संतोष ढवळे, पिंटु बांगर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed