November 29, 2021

सततच्या अत्याचाराला कंटाळुन अल्पवयीन मुलीने पिले विषारी द्रव्य – आरोपीला अटक

यवतमाळ – वणी —-प्रतिनिधी:-शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पुनवट येथील अल्पवयीन मुलीने सततच्या अत्याचाराला कंटाळून विषारी द्रव्य घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. या गंभिर प्रकरणाची माहिती मिळताच पीडितेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून शिरपुर पोलिसांनी एका तरुणाविरुद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
सविस्तर असे की, तालुक्यातील शिरपुर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या पुनवट येथील ९ व्या वर्गात शिक्षण घेत असलेली अल्पवयीन बालिका दि. ५ सप्टेंबर ला सकाळी शाळेत जात असतांना गावातील सागर राजू सातपुते (२४) याने तिला अडवून “तू मला खूप आवडतेस. तू माझ्या घरी चल” असे म्हटले. प्रसंगी बालिका खूप घाबरली होती परंतु बदनामीच्या भिंतीमुळे या घटनेची माहिती कुनाला दिली नव्हती. त्यामुळे आरोपीची हिंमत चांगलीच वाढली आणि त्यानंतर पुन्हा २७ सप्टेंबर ला पीडिता शाळेत जात असतांना सागर ने तिला स्वतःच्या घराजवळ अडविले आणि मागून पकडून घरातं नेऊन अत्याचार केला. कुणालाही काही सांगितल्यास तुझ्या आईला मारून टाकील अशी धमकी दिल्याने पीडिता घाबरली होती. तिने यावेळीही पुन्हा कोणालाही यासंदर्भात सांगितले नाही. आणी सागरची हिम्मत आणखीच वाढली. आणी पुन्हा ६ ऑक्टोबर २०२१ ला पीडिता ट्युशन वरून येत असतांना परत सागरने अडवून तिला घरी चालण्यास आग्रह केला. परंतु तिने नकार देऊन तेथून घरी निघून आली. सततची कटकट आणि त्रासाला कंटाळून तिने घरी असलेल्या शौचालयात जाऊन तेथील हॉरपिक घेऊन ते प्राशन केले. सदर बाब आईच्या लक्षात येताच तिने तात्काळ वणी येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दोन दिवसानंतर प्रकृती स्थिर झाल्यावर आई व मामांनी तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता. पीडित बालिकेने सर्व हकीकत कथन केली. आणि आई व मामाने तात्काळ शिरपूर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच पोलिसांनी सागर सातपुते ला ताब्यात घेत त्याचे विरुद्ध ३७६,(३),३५-,डी,३४१,५०६,भादंवी कलम ४,६,८,१२ पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली.
पुढील तपास ठाणेदार गजानन करेवाड यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक राम कांडूरे, सुगत दिवेकर करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *