शस्त्राने चेहरा चेंदा मेंदा करून युवकाचा झोपेत खून


दिग्रस तालुक्यातील साखरा येथील खळबळ जनक घटना

 

दिग्रस तालुका प्रतिनिधी :- दिग्रस तालुक्यातील साखरा येथे झोपेमध्ये असलेल्या एका युवकाचा शस्त्राने चेहरा चेंदा मेंदा करून खून केला.

विठ्ठल विजय जाधव वय वर्ष 25 राहणार साखरा असे या खून झालेल्या युवकाचे नाव आहे. सदर मृतक युवक हा साखरा या गावांमध्ये दिग्रस ते दारव्हा रस्त्यालगत पान टपरी चालवण्याचा व्यवसाय करीत होता. मृतक विठ्ठल विजय जाधव यांच्या घराचे बांधकाम चालू होते. तो छताच्या स्लॅब वर रात्रीच्या वेळेस झोपून होता. अशा वेळेस सकाळी त्याचे आई-वडील यांनी त्याला हालून उठवण्याचा प्रयत्न केला परंतु प्रतिसाद न मिळाल्यामुळे जवळ जाऊन हात लावून उठवण्याचा प्रयत्न केला असता मृतकाचा चेहरा शस्त्राने चंदामेंदा केल्याचे निदर्शनास आली. घटनेची माहिती प्रभारी ठाणेदार विजय रत्नपारखी यांना मिळाली त्यांनी याची दखल घेत तात्काळ घटनास्थळ गाठले . त्यांनी या बाबीची संपूर्ण पाहणी करून यवतमाळ येथून श्वनपथक सुद्धा बोलवण्यात आले होते. श्वनपथकामार्फत संपूर्ण परिसराची पाहणी करण्यात आली. दोन व्यक्तीचे फिंगरप्रिंट सुद्धा घेण्यात आले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed