अनैतिक संबंधातून प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच केला पतीचा खून ; सिंगद येथील प्राध्यापकाच्या खुनाचा अखेर उलगडा
सिंगद येथील प्राध्यापकाच्या खुनाचा अखेर उलगडा
तालुका प्रतिनिधी :- दिग्रस तालुक्यातील सिंगद येथील नाल्यामध्ये पुलाच्या खाली उमरखेड येथील एका प्राध्यापकाचा मृतदेह आढळून आला होता. या खुनाचा अखेर उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे.अनैतिक संबंधातून प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच पतीचा खून केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
एक ऑगस्ट रोजी दिग्रस तालुक्यातील सिंगद येथील एका पुलाखाली अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला होता. त्यावरून पोलिसांनी जलद गतीने तपासचक्र फिरवून फिरवले असता हा मृतदेह उमरखेड येथील प्राध्यापक सचिन वसंतराव देशमुख यांचे असल्याचे निष्पन्न झाले. शवविच्छेदन अहवालात त्याचा खुन करण्यात आल्याचे समोर आले. सचिन वसंतराव देशमुख (वय 32 राहणार उमरखेड ) याच्या खून प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गोपनीय माहितीवरून दोन संशयतांना ताब्यात घेण्यात आले.
पत्नी वनविभागात वनरक्षक म्हणून कार्यरत आहे. तर तिचा प्रियकर फॉरेस्ट गार्ड म्हणून वन विभागात कार्यरत आहे. या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतली असून पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा व सायबर सेल पथक करीत आहे.