उद्या शासन आपल्या दारी अभियानांतर्गत जिल्हास्तरीय भव्य कार्यक्रम मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती राहणार
कार्यक्रमाची तयारी अंतीम टप्प्यात
जिल्हाभरातून लाभार्थ्यांची उपस्थिती राहणार
यवतमाळ : सर्वसामान्य नागरिकांना कालमर्यादेत सेवा उपलब्ध करून देण्यासाठी शासन राबवित असलेल्या शासन आपल्या दारी अभियानाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम सोमवार दि.30 ऑक्टोंबर रोजी यवतमाळ शहरानजीक किन्ही या गावाजवळ आयोजित करण्यात आला. या भव्य कार्यक्रमाची तयारी अंतीम टप्प्यात आहे. जवळपास 35 हजार लाभार्थी या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहे.
कार्यक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते होईल तर अध्यक्षस्थानी पालकमंत्री संजय राठोड राहणार आहे. कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाचे अध्यक्ष आ.डॉ.वजाहत मिर्झा, खा.भावना गवळी, खा.हेमंत पाटील, आ.ॲड.निलय नाईक, आ.किरण सरनाईक, आ.धीरज लिंगाडे, आ.प्रा.डॉ.अशोक उईके, आ.मदन येरावार, आ.संजीवरेड्डी बोदकुरवार, आ.डॉ.संदीप धुर्वे, आ.नामदेव ससाणे, आ.इंद्रनील नाईक, विभागीय आयुक्त डॉ.निधी पाण्डेय, विशेष पोलिस महानिरिक्षक जयंत नाईकनवरे उपस्थित राहणार आहे.
या कार्यक्रमास जिल्हाभरातून 35 हजाराहून अधिक लाभार्थी उपस्थित राहणार आहे. त्यातील काही लाभार्थ्यांना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्याहस्ते प्रत्यक्ष लाभाचे वितरण केले जाणार आहे. कार्यक्रमस्थळी रोजगार मेळाव्यासह विविध विभागांचे स्टॅाल राहणार आहे. या ठिकाणी लाभार्थ्यांना विविध योजनांची माहिती दिली जातील. कार्यक्रमासाठी येणाऱ्या लाभार्थ्यांना कार्यक्रमस्थळी येणे व जाण्याची व्यवस्था शासनाच्यावतीने करण्यात आली आहे.
लाभार्थ्यांना नास्ता, भोजन व पाण्याची पुरेशी व्यवस्था करण्यात आली आहे. किन्ही येथे भव्य मंडप उभारण्यात आला असून येथे येणाऱ्या वाहनांठी पार्कीग, आपत्कालीन परिस्थितीसाठी वैद्यकीय सुविधांसह आवश्यक सर्व सुविधा निर्माण करण्यात आल्या आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गठीत करण्यात आलेल्या सर्व समित्यांनी आपआपली जबाबदारी चोखपणे पार पाडली असून हा भव्य कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व विभागप्रमुख झटत आहे.
*कार्यक्रमस्थळी सत्यपाल महाराजांचे किर्तन*
मनोरंजनातून प्रबोधनासाठी प्रसिध्द असलेल्या सत्यपाल महाराजांचे किर्तन शासन आपल्या दारी या कार्यक्रमात आयोजित करण्यात आले आहे. सकाळी 10.30 वाजता महाराजांच्या किर्तनास सुरुवात होईल. मुख्य कार्यक्रमासह नागरिकांनी किर्तनाचा देखील लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पवन बन्सोड यांनी केले आहे.