आरक्षण मिळे पर्यंत पक्षाचे काम करणार नाही – माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर

जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत काँग्रेस पक्षाचा व सदस्यत्वाचा काम करणार नाही असे पत्र आज दि. 27 रोजी माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांनी प्रदेश कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष नाना पटोले यांना पाठविले त्यामुळे तालुक्यात • खळबळ उडाली आहे.

राज्यात बहुसंख्येने असलेल्या मराठा समाजाचे अनेक वर्षापासून आरक्षणाची मागणी आहे बहुसंख्य मराठा समाज अत्यल्प भूधारक असल्याने समाजाची आर्थिक परिस्थिती दयनीय आहे.

त्यामुळे शिक्षण व नोकरीमध्ये आरक्षण मिळावे ही मागणी सातत्याने होत आहे परंतु सरकारकडून चाल ढकल होत असल्याने समाज बांधवांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत काँग्रेस पक्षाचा व सदस्य पदाचा काम करणार नाही पहिले आरक्षण, पक्ष नंतर ही भूमिका घेत अशा आशयाचे पत्र माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांनी नाना पटोले यांना पाठविण्यात आले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed